सांगोला नगरपरिषदेमार्फत आयोजित वसुंधरा फेस्टला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोले नगरपरिषदेमार्फत माझी वसुंधरा अभियानाची शहरात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे . महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत 2 ऑक्टोबर 2020 पासून राज्यभरात माझी वसुंधरा अभियान 2. 0 राबविले जात आहे . हे अभियान पृथ्वी , वायू , जल , अग्नी आणि आकाश या पंचतत्वाचा वर आधारित असून पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे .
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोले नगरपरिषदे मार्फत माझी वसुंधरा अभियानाची शहरात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे . या अभियानाच्या माध्यमातून शहरात ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणे , वृक्षारोपण करणे , वीज व पाण्याचे काटकसरीने बचत करणे याबाबतची जनजागृती तसेच सायकल व विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करणेसाठी प्रोत्साहित करणे , सौर ऊर्जा बाबत जनजागृती करणे इत्यादी उपक्रम नगरपरिषदे मार्फत शहरात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहेत .
याचाच एक भाग म्हणून सांगोला नगरपरिषदेमार्फत वसुंधरा फेस्ट अर्थात पर्यावरण पूरक गोष्टींचे प्रदर्शन भरविण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली . या प्रदर्शनामध्ये इलेक्ट्रिकल टू व्हीलर , सोलर सिस्टिम , एलईडी बल्ब , विविध प्रकारचे देशी व विदेशी रोपे , गांडूळ खत , सेंद्रिय भाजीपाला , कापडी पिशव्या , टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू व बचत गटांच्या महिलांचे विविध खाद्यपदार्थ ची दुकाने असे साधारण 20 स्टॉल लागले होते . या प्रदर्शनाच्या माध्यमातून " सांगोला शहरातील नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाप्रती जनजागृती करणे व महिला बचत गटांच्या व्यवसायास बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा महत्वाचा उद्देश होता .
या वसुंधराफेस्ट च उदघाटन नगराध्यक्षा सौ . राणिताई माने यांनी केले . यावेळी नगरसेविका स्वाती मगर , नगरसेवक सुरज दादा बनसोडे , अध्यक्ष , मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी आपली मनोगते व्यक्त केली . यावेळी सचिन लोखंडे , जुबेर मुजावर , अस्मिर तांबोळी , रफिक तांबोळी , अप्सराताई ठोकळे , छाया ताई मेटकरी , शोभा काकी घोंगडे , आनंद काका घोंगडे , अनुराधा खडतरे , दादा खडतरे इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून प्रदर्शनात सहभागी स्टॉल धारकांचा उत्साह वाढविला .
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर यांनी तर समारोप योगेश गंगाधरे यांनी केला . हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिलाषा निंबाळकर , योगेश गंगाधरे , शिवाजी सांगळे , नयन लोखंडे , विजय कन्हेरे , स्वप्नील हाके , तृप्ती रसाळ , तुकाराम माने , विनोद सर्वगौड , अमित कोरे , राहुल खडतरे या सर्व टीम ने मेहनत घेतली .
0 Comments