google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 एसटी कर्मचारी संपाचं करायचं काय?; शेवटी सरकार उचलणार ‘हे’ पाऊल

Breaking News

एसटी कर्मचारी संपाचं करायचं काय?; शेवटी सरकार उचलणार ‘हे’ पाऊल

 एसटी कर्मचारी संपाचं करायचं काय?; शेवटी सरकार उचलणार ‘हे’ पाऊल



अनेक प्रकारे कारवाया करून देखील एसटी कर्मचारी संपावर ठाम असल्याने सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे. एककीडे एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न असून दुसरीकडे सर्वसामान्य जनताही भरडली जात आहे.



हे लक्षात घेत आणि पुन्हा एकदा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आली असून ही कारवाई आता अधिक तीव्र करण्यात येईल, अशी भूमिका परिवनहन मंत्री परब यांनी घेतली आहे.



परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. आमच्यावर ज्या प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे, तशीच ती सर्वसामान्य जनतेचंही आहे. त्यामुळे एसटी कामगारांनी संप आणखी ताणून धरू नये.



त्यांनी कामावर परत यावे. दोन महिन्याचा पगार मिळाला नाही तर एसटी कर्मचाऱ्यांचेच नुकसान होणार आहे. यात कोण्या नेत्याचे नुकसान होणार नाही. आता बडतर्फीची कारवाई सुरू झाली असून ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल, असे परब यांनी म्हटले आहे.



एसटी कर्मचाऱ्यांना ४१ टक्के पगार वाढ देण्यात आली असून आता त्यांनी अधिक ताणून धरू नये. एका शब्दावर अडून बसू नये. बडतर्फीची कारवाई सुरू झाली आहे. आता एसटी विरोधातील कारवाई तीव्र करावी लागणार आहे. जनतेलाही उत्तर द्यायचे आहे. एसटी ही अत्यावश्यक सेवेत मोडते, त्यामुळे लवकर कामावर रुजू व्हा, असे कळकळीचे आवाहन परब यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.

Post a Comment

0 Comments