google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कमलापूर प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अनिल खटके यांची निवड

Breaking News

कमलापूर प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अनिल खटके यांची निवड

 कमलापूर प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अनिल खटके यांची निवड


सर्व निवडी शांततेत पार पाडण्याची परंपरा राखली अबाधित


सांगोला :- जिल्हा परिषद शाळांच्या विविध गरजा सोडवून शाळांची चौफेर प्रगती व्हावी यासाठी या शाळांवर स्थानिक पातळीवरच्या समितीचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नियंत्रण असावे यासाठी शासनाच्या निर्धारित आदेशानुसार गावपातळीवरील शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समिती कार्यान्वित केली जाते. या आदेशानुसार कमलापूरचे प्रतिष्ठीत नागरिक व उद्योगपती बाबुराव बंडगर व केंद्रप्रमुख अमोघसिद्ध कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कमलापूर या केंद्र शाळेसाठी नूतन व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. यामध्ये अनिल खटके यांची अध्यक्षपदी तर प्रियंका चंदनशिवे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.



यावेळी प्रदिप कुमार चंदनशिवे, सोमनाथ अनुसे, दिलीप चंदनशिवे, भारत चंदनशिवे, प्रियंका चंदनशिवे, अश्वीनी वाघमारे, शोभा बन्ने, रुपाली भंडारे, नंदा ऐवळे, अश्विनी गडहिरे, दिव्या चंदनशिवे, निलम जगताप, ग्रामपंचायत सदस्य नितीन काळे, शिक्षणतज्ञ पांडुरंग काळे, शिक्षक प्रतिनिधी दत्तात्रय डांगे, विद्यार्थीनी सदस्य किरण भंडारे, विद्यार्थी प्रतिनिधी आर्यन चंदनशिवे, तर सचिव केंद्रीय मुख्याध्यापक बशीर मुलाणी या निवडीही एकमताने पार पडल्या.



ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब अनुसे यांनी कोरोना व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर या शाळेतील १५० विद्यार्थ्यांसाठी १५० मास्क व ५ लीटर सॅनिटायजर भेट देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी प्रतिष्ठीत नागरिक विजय अनुसे, प्रा. एन. डी. बंडगर, ग्रामपंचायत सदस्य डॉ. सतीश तंडे, माजी मुख्याध्यापिका सुरेखा पाटील, दत्तात्रय डांगे, स्वाती बनसोडे, वंदना काळे, सुरेखा शिंदे आदी मान्यवरासह अनेक पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदवीधर शिक्षक दत्तात्रय डांगे यांनी केले तर आभार सोमनाथ अनुसे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments