शेकाप सावरतोय मजबूत होतोय हे मात्र नक्की…!!
शेकाप सावरतोय…
शेतकरी कामगार पक्षामध्ये गणपतरावजी देशमुख यांच्या निधनानंतर जी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती ती डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे,तसेच पक्षाला सावरताना दिसत आहेत, काही ठिकाणी पक्षांतराच्या बातम्या ऐकण्यात येत आहेत ,परंतु आबांच्या निधनानंतर पक्षाची जितकी पडझड होईल असे वाटले होते तितकी पडझड पक्षाची झाली नाही ही वस्तुस्थिती आहे. याचं कारण मला वाटतंय पन्नास वर्षांमध्ये जी पक्षाची बांधणी गणपतरावांनी केली होती त्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता पक्षापासून हालायला तयार नाही पक्ष सोडायला तयार नाही.
खरी कसोटी तर नगरपरिषदेच्या निवणुकीत तसेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा कस लागणार आहे. कारण शेतकरी कामगार पक्षाचे जुने निष्ठावान कार्यकर्ते व तरुण कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन निवडणुकीला सामोरे जायचे आहे परंतु बाबासाहेब देशमुखांच्या देहबोलीवरून व शांत व संयमी वागणुकीने तालुक्यातील तरुण पिढीचे लक्ष वेधून घेतले आहे यात तिळमात्र शंका नाही, भारतीय लोक खूप भावनाप्रधान आहेत असं म्हणतात ,आणि या गोष्टीचा सगळ्यात जास्त परिणाम ते राजकीय वारसदार निवडीत दिसून आला आहे ,
म्हणूनच की काय सांगोल्यातील लोक डॉ बाबासाहेबांमध्ये गणपत आबांची छबी पाहण्याचा ते प्रयत्न करताना दिसून येत आहे ,परंतु राजकीय नेतृत्वाची खरी कसोटी जशी पराभवानंतर असते तशीच ती विजयनंतरही असते,कारण पराभवानंतर कार्यकर्त्याच्या फार अपेक्षा नसतात परंतु विजयानंतर पक्षातील कार्यकर्त्याच्या अपेक्षा वाढलेल्या असतात ,रुसवे फुगवे चालू होतात,त्याचवेळी नेतृवाची खरी कसोटी लागते त्या कसोटीवर शेकापचे नेतृत्व कसा प्रतिसाद देतंय हे पाहणे महत्वाचे असेल.परंतू शेकाप सावरतोय मजबूत होतोय हे मात्र नक्की…!!दत्ता टापरे [9423100717]

0 Comments