google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : ओमिक्रॉनच्या भितीने लसीकरण : केंद्रावर वाढली गर्दी

Breaking News

सोलापूर : ओमिक्रॉनच्या भितीने लसीकरण : केंद्रावर वाढली गर्दी

 सोलापूर : ओमिक्रॉनच्या भितीने लसीकरण : केंद्रावर वाढली गर्दी


सोलापूर : कोरानानंतर आता ओमिक्रॉन या नव्या विषाणूच्या भीतीने नागरिकांची पावले आता लसीकरण केंद्राकडे वळत आहेत. एरव्ही महापालिकेच्या ३५ मुख्य आणि छोट्या ६० ते ७० कॅम्पच्या माध्यमातून दिवसाकाठी अडीच-तीन हजार लसीकरण होत असे.


मागील दोन दिवसात लसीकरण करून घेणाऱ्यांची संख्या प्रतिदिवस दहा हजारांवर पोहचली आहे. चार महिन्यानंतर महापालिकेची आरोग्यकेंद्रे पुन्हा हाऊसफुल्ल दिसत आहेत.

महापालिका आरोग्य विभाग लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी गेल्या चार महिन्यापासून मोबाईल क्‍लिनिक, युवा स्वास्थ अभियान आणि आता 'हर घर दस्तक' असे विविध उपक्रम राबवित आहे. मात्र, गेल्या आठवड्याभरात देशात ओमिक्रॉनचे तीन रुग्ण आढळल्याने नागरिकांच्या मनात व्हायरसची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी वाढली आहे. १९ जानेवारी २०२१ मध्ये सोलापूर जिल्ह्याठी ३६ हजार लस प्राप्त झाले होते. त्यानंतर पहिले दोन महिने फ्रंटलाईन वर्कर आणि ६० वर्षांपुढील को-मॉर्बिड नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले.


मार्च महिन्यापासून ४४ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरणाची मुभा देण्यात आली. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली. आज शहरात लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांची संख्या ७ लाख ३४ हजार इतकी आहे. त्यात पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५ लाख ९६१ इतकी आहे, तर दुसरा डोस झालेल्यांची संख्या २ लाख ७० हजार १९७ अद्यापही शहरातील २ लाख ३३ हजार लोकांनी कोरोना लसीचा डोस घेतला नाही. शासनाकडून लसीचा मुबलक पुरवठा होत आहे.


आज महापालिकेकडे ४० हजार लस उपलब्ध आहेत आणि दर दोन दिवसाला लसीचा साठा मिळत आहे. नागरिकांनी वेगवेगळ्या व्हायरसपासून स्वत:चे संरक्षण करायचे असल्यास दोन डोस घ्यावे, असे आवाहनही महापालिका आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
व्हायरसपासून स्वत:चे संरक्षण करायचे असल्यास दोन डोस हेच एकमेव पर्याय आहे.

नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात लसीची उपलब्धता आहे तर याबाबत कोणतेही गैरसमज न बाळगता लसीचे दोन डोस घेऊन स्वत:सह परिवारालाही सुरक्षित ठेवावे. गेल्या दोन दिवसांपासून नागरिक लसीकरणासाठी मोठ्या संख्येने येत आहेत.
- डॉ. मंजिरी कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी महापालिका


आकडे बोलतात
२० नोव्हेंबर - ३ हजार २३८
२२ नोव्हेंबर - ३ हजार ९९६
२३ नोव्हेंबर - ३ हजार ४८२
२४ नोव्हेंबर - ४ हजार ६७६
२५ नोव्हेंबर - ४ हजार १५४
२६ नोव्हेंबर - ३ हजार ६०२
२७ नोव्हेंबर - ५ हजार ३४१
२९ नोव्हेंबर - ८ हजार २८९
३० नोव्हेबर - १० हजार २७९

Post a Comment

0 Comments