google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला : …अखेर ‘त्या’ भूखंड घोटाळ्यातील क्षेत्र वाढ दुरुस्ती करण्याचे आदेश पारित; ‘अमररत्न’ने या घटनेची घेतली होती गंभीर दखल!

Breaking News

सांगोला : …अखेर ‘त्या’ भूखंड घोटाळ्यातील क्षेत्र वाढ दुरुस्ती करण्याचे आदेश पारित; ‘अमररत्न’ने या घटनेची घेतली होती गंभीर दखल!

 सांगोला : …अखेर ‘त्या’ भूखंड घोटाळ्यातील क्षेत्र वाढ दुरुस्ती करण्याचे आदेश पारित; ‘अमररत्न’ने या घटनेची घेतली होती गंभीर दखल!

सांगोला (प्रतिनिधी) : तालुक्यातील त्या भूखंड घोटाळ्यातील क्षेत्र वाढ दुरुस्ती करण्याचे आदेश अखेर पारित करण्यात आले आहे. ‘अमररत्न’ न्यूज व इतर माध्यमांनी या घटनेची गंभीर दखल घेतली होती. प्रशासनाचे योग्य तत्परता मात्र क्षेत्र वाढ करणारा ‘तो’ घोटाळेबाज अद्यापही गुलदस्त्यात आहे.



शहरातील भूमी अभिलेख कार्यालय काही दिवसापूर्वी एका घटनेमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांमधून चर्चिला जात होता. काही दिवसापूर्वी सांगोला भुमी अभिलेख कार्यालय मध्ये एका मालमत्तेवर संबंधित कार्यालय मधील व्यक्तीला हाताशी धरून त्या मालमत्तेमध्ये क्षेत्र वाढ झाली होती. ही बाब लक्षात येता काही जागृत नागरिकांनी या भूमी अभिलेख कार्यालय यासंबंधी विचारणा केली असता टॉलीवूड उत्तरे मिळू लागल्याने तक्रारदारांनी त्या मालमत्ते बद्दल कागदपत्रांची मागणी केली असता तेथील कर्मचारी सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव झाल्यानंतर याबद्दल वरिष्ठांकडे दाद मागण्यात आली.



त्यावेळी कार्यालयामध्ये नव्याने रुजू झालेल्या उपाध्यक्ष मॅडम यांनी या गंभीर घटनेची योग्य ती दखल घेत आवश्यक असणारे कागदपत्रांची तक्रारदारांना पूर्तता करण्यात यावे असे कर्मचाऱ्यांना आदेश करण्यात आले त्यानंतर या सर्व कागदपत्रांची पाहणी केली असता संबंधितांना या झालेल्या घटनेबद्दल माहिती मिळाल्यानंतर तक्रारदार व संबंधित मालमत्ताधारकांना याबाबत नोटीस काढण्यात आली.



त्यानंतर दोन्ही चे म्हणणे ऐकून क्षेत्र वाढ कार्यालय मधूनच कोणीतरी व्यक्तीने केली असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कार्यक्षम असलेल्या उपाध्यक्ष मॅडम यांनी त्याची माहिती वरिष्ठांकडे पाठवण्यात आली.



त्यानंतर वरिष्ठांकडून कलम 258 नुसार झालेल्या मालमत्ता प्रॉपर्टी कार्ड मध्ये दुरुस्ती होऊन पहिल्याप्रमाणे मालमत्ता प्रॉपर्टी कार्ड करावे असे सूचना देत आदेश पारित करण्यात आले. या गंभीर घटनेची योग्य वेळी दखल घेत तत्परता दाखवल्याबद्दल उपाध्यक्ष मॅडम यांचे सर्व तालुक्यामधून कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments