google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पंढऱपुर तालुक्यातील सासरेबुवाचा प्रताप! आंघोळ करताना सुनेचा व्हिडीओ करून संबंध ठेवण्यासाठी केलं

Breaking News

पंढऱपुर तालुक्यातील सासरेबुवाचा प्रताप! आंघोळ करताना सुनेचा व्हिडीओ करून संबंध ठेवण्यासाठी केलं

 पंढऱपुर तालुक्यातील सासरेबुवाचा प्रताप! आंघोळ करताना सुनेचा व्हिडीओ करून संबंध ठेवण्यासाठी केलं पंढऱपुर तालुक्यातील सासरेबुवाचा प्रताप! आंघोळ करताना  सुनेचा व्हिडीओ करून संबंध ठेवण्यासाठी केलं "ब्लॅकमेल"


  पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत सदर गुन्ह्यातील पिडीता राहणेस असुन मागील दोन आठवड्यापुर्वी दुपारी 12/30 वा.चे सुमारास पिडीता हि एकटी घरी असताना पिडीताचे सासरे यांनी पिडीता हिचे अंगावर हात टाकुन तिचेशी बऴजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेऴी पिडीता हि जोरात ओरडल्यानंतर तिला त्यांनी सोडुन दिले होते. घडलेला सदर प्रकार हा पिडीता हीने त्याचे पती यांना सांगीतला होता पंरतु त्यावेऴी पिडीतेची समजुत घातली होती.



 दिनांक 20/12/2021 रोजी सकाळी 08/00 वा.चे सुमारास पिडीता हि घराचे समोर असलेल्या बाथरुममध्ये आंघोळ करत असताना पिडीतचे सासरे याने पिडीतीचे न कळत त्यांचे मोबाईलमध्ये शुटींग काढले व सदरची शुटीग हि पिडीतेस दाखवुन तिस तुला माझे मुलापासुन मुलबाळ होणार नाही तु माझेशी संबंध ठेव तुला मुलबाळ होईल. तु संबंध नाही ठेवले तर मी तुझे आंघोळ करतानाचे शुटींग पुढे पाठविण असे म्हणुन ब्लॅकमेल केले. त्यावेळी पिडीता हिने फोन करण्याचे कारणाने तिचे सासरेचा मोबाईल घेतला व सासऱ्याची नजर चुकवुन तो पिडीता हिने पाहुन खात्री करुन तो पिडीतेचा भाऊ याचे मोबाईलवर पाठवला होती.



त्यानंतरही पिडीता हिचे सासरे यांनी पिडीता हिची अंघोळ करतानाची शुटींग पिडीता हिस वांरवार दाखवुन तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत असलेने पिडीता हि माहेरी मंगळवेढा येथे जावुन तीचे आईवडीलांना सदरचा प्रकार सांगुन आज रोजी पंढऱपुर ग्रामीण पोलीस ठाणेस तक्रार दिल्याने पंढऱपुर ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं 434/2021 भा.द.वि कलम 354, 354अ (दोन), 354(क), 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्यातील आरोपी सासरा यास ताब्यात घेण्यात आले आहे. 



सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते सोलापुर ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधिक्षक हिमंत जाधव सोलापुर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पंढऱपुर विभाग पंढऱपुर व पोनि धनंजय अ. जाधव, पोलीस निरीक्षक पंढऱपुर ग्रामीण पोलीस ठाणे याचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आप्पा कर्चे हे करीत आहेत. 



सदरची घटना सासरे आणि सुन यांचे नात्याला काळीमा फासणारी आहे. तरी सदरची बातमी समाज जागृतीसाठी आपले लोकप्रिय वृत्तपत्रात प्रसिध्द करणेस विनंती आहे.

Post a Comment

0 Comments