google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूरकरांनों तुम्हाला लॉकडाऊन हवाय की लसीकरण ; निर्णय घ्या, मुंबईत एका दिवसात वाढले इतके रुग्ण

Breaking News

सोलापूरकरांनों तुम्हाला लॉकडाऊन हवाय की लसीकरण ; निर्णय घ्या, मुंबईत एका दिवसात वाढले इतके रुग्ण

 सोलापूरकरांनों तुम्हाला लॉकडाऊन हवाय की लसीकरण ; निर्णय घ्या, मुंबईत एका दिवसात वाढले इतके रुग्ण

सोलापूर : राज्यात मागील काही दिवासांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत बुधवारी २ हजार ५१० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील मागील काही महिन्यात कोरोना रुग्णांची वाढलेली ही सर्वात मोठी संख्या आहे.



मंगळवारी रुग्ण संख्या १ हजार ३७७ होती. तर बुधवारी मुंबईत गेल्या २४ तासांपासून २५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच मुंबईत आज केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला असला तरी वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. एकट्या मुंबईत राज्यातील ८० टक्के रुग्ण आढळले आहेत.



दरम्यान, मुंबईत सध्या ८ हजार६० अँक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत आज दिवसभरात ५१ हजार ८४३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील २ हजार ५१० कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतील सध्या १ सक्रीय कंटेनमेंट झोन आहे. मुंबईतील सक्रीय सीलबंद इमारतींची संख्या ४५ आहे.



याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर व जिल्ह्यात सुदैवाने रुग्ण संख्या कमी असली तरी ती वाढायला वेळ लागणार नाही. सोलापूरची मुंबई व पुण्याची कनेक्टिव्हिटी जास्त असल्याने काहीही होऊ शकते. जरी रुग्ण वाढले तरी लस घेणे हाच एकमेव सुरक्षेचा पर्याय आहे.  



सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे लसीकरणासाठी वारंवार आवाहन करत आहेत. रोजच्या रोज प्रशासनाकडून आढावा घेत आहेत, लसीकरणासाठी काही निर्बन्ध कडक केल्याने प्रमाण वाढलं असलं तरी अद्यापही लाखो लोकांनी लस घेतली नाही. 



लस न घेणाऱ्यांची 18 ते 45 या वयोगटातील सर्वाधिक संख्या असून त्यांच्यात जनजागृती आवश्यक आहे. हीच मंडळी बाहेर फिरून संसर्ग घरी नेतात आणि घरातील 50 च्या पुढच्या वयोगटातील माणसांना कोरोनाची लागण होते. म्हणून सोलापुरकरांना लॉकडाऊन हवाय की लसीकरण? हा प्रश्न जिल्हा प्रशासनाने उपस्थित केला आहे. लस घ्या सुरक्षित व्हा, मास्क वापरा संसर्ग टाळा हीच सूत्री सोलापूरला वाचवू शकते.

Post a Comment

0 Comments