आता वाहन परीक्षक चालवणार एसटी ! संप मिटत नसल्याने महामंडळाचा निर्णय
दि . २ ९ डिसेंबर मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे . विविध प्रकारे कारवाई केली जात असतानाही अनेक आगारातून अद्याप एसटी बाहेर पडलेली नाही . त्यामुळे आता वाहन परीक्षकांनाच एसटी चालविण्यासाठी रस्त्यावर आणले जाणार आहे .
यासंदर्भात एसटी महामंडळ विचार करत असून लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल अशी माहिती महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली . सध्या राज्यातील २५० पैकी किमान ९ २ एसटी आगार संपामुळे बंद आहेत . तर १५८ आगारातून तुरळक एसटी सेवा सुरू आहे . यामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहे .
त्यामुळे आता कामावर रुजू असणाऱ्या परीक्षकांनाच एसटी वाहन चालविण्यासाठी तैनात केले जाणार आहे . वाहन परीक्षक हे वाहन तपासणीचे काम करत असतात . तसेच कोणत्या मार्गावर कोणत्या व किती गाड्या सोडायच्या ही जबाबदारी त्यांची असते . पण आता प्रत्यक्ष एसटी चालविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाणार असून त्याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले .
0 Comments