ग्रामीण भागात सभा , मिरवणुका घेण्यास बंदी
सोलापूर सोलापूर पोलीस आयुक्तालय हद्द वगळून ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीमध्ये सर्वत्र शांतता , कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून २८ डिसेंबर २०२१ रोजी | सकाळी ८ वाजेपासून ते ११ जानेवारी २०२२ रोजी रात्री १० पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १ ९ ५१ चे कलम ३७ | ( १ ) आणि ३७ ( ३ ) चे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी शमा पवार यांनी जारी केले आहेत .
त्यानुसार ग्रामीण भागात सभा , मिरवणुका व पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे . या आदेशानुसार शस्त्रे , तलवारी , भाले , झेंडा लावलेली काठी किंवाशरीरास इजा करण्याकरिता वापरता येईल , अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे , कोणताही ज्वालाग्रही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे , फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे ,
व्यक्ती अगर त्यांची प्रेतयात्रा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे , सार्वजनिक घोषणा करणे , असभ्य हावभाव करणे , ग्राम्य भाषा वापरणे , सभ्यता अगर नीतीविरुध्द निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील , त्यामुळे त्यांच्यात भांडणे , बखेडे निर्माण होऊन शांततेस बाधा होईल , सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करून त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे .
0 Comments