google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला आठवडा बाजारात चोरीची म्हैस विकत घेणे ग्राहकाच्या आले अंगलट

Breaking News

सांगोला आठवडा बाजारात चोरीची म्हैस विकत घेणे ग्राहकाच्या आले अंगलट

          सांगोला आठवडा बाजारात चोरीची म्हैस विकत घेणे ग्राहकाच्या आले अंगलट



कोल्हापूर येथून चोरीला गेलेली म्हैस सांगोल्याच्या जनावरांच्या बाजारात दिसताक्षणी मूळ मालकाने ती ओळखली . मात्र , ग्राहकाने म्हैस तुमचीच कशावरून असे फटकारले . त्यावेळी त्यांनी म्हैस सोडल्यावर कळेल असे म्हणताच , सोडलेली म्हैस ओरडत तिच्या मूळ मालकाच्या मागे धावू लागली आणि चोरीची म्हैस विकत घेणे ग्राहकाच्या चांगलेच अंगलट आले . कुडित्रे ( तालुका करवीर , जिल्हा कोल्हापूर ) येथील महेश विलास पाटील यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेली 10 हजार रुपये किमतीची मुरा जातीची म्हैस एक हजार रुपयांचे सहा महिन्याचे रेडकू चोरीला गेल्याचे निदर्शनास आले होते .


 याप्रकरणी करवीर पोलिसात म्हैस चोरीला गेल्याची तक्रार दाखल होती . दरम्यान , महेश पाटील यांच्यासह त्यांच्या मित्रांनी रविवारी सांगोल्यातील जनावरांचा बाजार गाठून चोरीला गेलेल्या म्हशीचा शोध घेत होते . त्यावेळी त्यांना नेमके त्यांच्या म्हशीचे रेडकू झाडाला बांधलेल्या अवस्थेत निदर्शनास आले . दरम्यान , ही म्हैस मूळ मालकाला ताब्यात मिळणार आहे . ही कामगिरी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार असलम काझी , हवालदार चंद्रकांत गोडसे , पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे , गणेश कोळेकर यांनी केली आहे .

Post a Comment

0 Comments