राज्यात महिला अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे . पुण्यात संतापजनक अशी एक घटना घडली आहे . लाडीगुडी लावून काकाने आपल्याच 7 वर्षाच्या पुतणीवर गेल्या 6 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . याप्रकरणी एका 28 वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
त्यावरुन पोलिसांनी मांजरी येथील 22 वर्षाच्या दिराला अटक केली आहे . याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , हा प्रकार जून ते 6 डिसेंबर 2021 दरम्यान वारंवार मांजरीतील एका सोसायटीत घडला आहे . फिर्यादी त्यांचा दिर असलेल्या आरोपीने त्यांच्या 7 वर्षाच्या मुलीला लाडीगोडी लावली . तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध केले . हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या बापाला जीवे ठार मारील अशी धमकी दिली .
त्यामुळे हा प्रकार तिने कोणाला सांगितला नव्हता . मात्र , तिला त्रास होऊ लागल्याने तिने हे आईला सांगितले . त्यानंतर त्यांनी हडपसर पोलिसांकडे धाव घेतली असून पोलीस उपनिरीक्षक गोसावी अधिक तपास करीत आहेत.महिला अन्याय अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी शासन पातळीवर काय उपाययोजना आखल्या जाणार आहेत ? असा प्रश्नही सामाजिक संघटना उपस्थित करीत आहेत .

0 Comments