google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर - वाडी रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्णत्वाला , सोलापूरकरांचा प्रवास होणार गतिमान

Breaking News

सोलापूर - वाडी रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्णत्वाला , सोलापूरकरांचा प्रवास होणार गतिमान

 सोलापूर - वाडी रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्णत्वाला , सोलापूरकरांचा प्रवास होणार गतिमान


सोलापूर : सोलापूर विभागातील सोलापूर-वाडी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच सोलापूर ते वाडी दरम्यान रेल्वे विजेवर धावणार आहेत. यामुळे सोलापूरकरांचा प्रवास अधिक गतीमान होणार आहे.सोलापूर विभागात दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम 2010 पासून सुरू आहे. सोलापूर ते वाडी या 170 किलोमीटरच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.


 या मार्गावर लवकरच विजेवरील गाडय़ा धावणार आहेत. त्यामुळे सोलापूरकरांना याचा फायदा होणार आहे. दुधनी ते कलबुर्गी आणि कलबुर्गी ते वाडी या दरम्यान यापूर्वीच विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, या सेक्शनमध्ये गाडय़ा विजेवर धावण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूर ते होटगी हा 15 किलोमीटरच्या सेक्शनदरम्यान विद्युतीकरणाचे काम राहिले होते. हे कामदेखील आता पूर्ण झाले आहे.


या मार्गाची पाहणी मुख्य संरक्षक आयुक्त मनोज अरोरा यांनी नुकतीच केली. याच मार्गावर ताशी 110 किलोमीटर वेगाने विजेवरील रेल्वे इंजिनची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली आहे. सध्या मोहोळ ते बाळे आणि भाळवणी ते भिगवण दरम्यान विद्युतीकरणाचे आणि दुहेरीकरणाचे काम सुरू असून, हेदेखील काम लवकरच पूर्ण केले जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. सध्या सोलापूर रेल्वेस्थानक ते मोहोळ दरम्यान शेतकऱयांच्या जमिनीचा हस्तांतरणाचा वाद सुरू असल्याने हे काम थांबले आहे.


विजेवरील रेल्वेमुळे इंधन व वेळेचीही बचत होणार आहे. सोलापूर ते वाडी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, या मार्गावर लवकरच विजेवरील मेल, पॅसेंजर, एक्प्रेस व मालगाडय़ा धावणार आहे. यावेळी प्रधान मुख्य विद्युत अभियंता गोपाल चंद्रा, मुख्य विद्युत वितरण अभियंता एच. एम. शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता, वरिष्ठ विभागीय विद्युत इंजिनीअर अनुभव वार्ष्णेय, अभियांत्रिकी, परिचालन, सिग्नल ऍण्ड टेलिकम्युनिकेशन विभाग व इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


दुधनी ते कलबुर्गी 140 किलोमीटर, कलबुर्गी ते वाडी 157 किलोमीटर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या सेक्शनमध्ये गाडय़ा विजेवर धावण्यास सुरुवात झाली आहे. आता, सोलापूर ते होटगी या सेक्शनचेदेखील काम पूर्ण होऊन चाचणीदेखील यशस्वी झाली आहे. त्यामुळे लवकरच सोलापूर ते वाडी दरम्यान विजेवर गाडय़ा धावणार आहेत.

Post a Comment

0 Comments