google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शेकापला अखेरचा लाल सलाम करीत बुद्धेहाळ येथील मा.सरपंच, उपसरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश..!

Breaking News

शेकापला अखेरचा लाल सलाम करीत बुद्धेहाळ येथील मा.सरपंच, उपसरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश..!

 शेकापला अखेरचा लाल सलाम करीत बुद्धेहाळ येथील मा.सरपंच, उपसरपंच यांच्यासह शेकडो  कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश..! 


बुद्धेहाळ येथे 50 वर्षाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग 

सांगोला : तालुका/ प्रतिनिधी ;- एकेकाळी बलाढ्य समजल्या जाणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला सक्षम आणि कणखर नेतृत्व नसल्याने बुध्देहाळ ता.सांगोला येथील माजी सरपंच, उपसरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शेकापला अखेरचा लाल सलाम करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम.दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. रविवार दि 5 डिसेंबर रोजी सांगोला येथील राष्ट्रवादी भवन येथे शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष मा.आम.दिपकआबा साळुंखे पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती अनिल मोटे, शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, ज्येष्ठ नेते वसंतआप्पा जरे, राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष अनिलनाना खटकाळे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, उपाध्यक्ष गिरीश पाटील सर, सत्यवान यादव, कोंडीबा लवटे आदींसह पदाधिकारी व बुद्धेहाळ परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. 


 अनेक वर्षे शेतकरी कामगार पक्षात निष्ठेने व समर्पणाच्या भावनेने कार्य करूनही जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने बुद्धेहाळ ता सांगोला येथील माजी सरपंच संजय जावीर, उपसरपंच गणेश कोळेकर, संपत कोळेकर, भीमराव कोळेकर, बापू कोळेकर, गोविंद लवटे, प्रकाश कांबळे, शंकर खरात, विष्णू गडदे, दादा गडदे, पोपट कोळेकर, सागर कांबळे, हरिबा जावीर, रंगनाथ लवटे, बुद्धेहाळ येथील दूध संस्थेचे चेअरमन सतीश लवटे, धनाजी गडदे, महादेव गडदे, जगन्नाथ पुकळे, तायाप्पा गडदे, मनोज सरगर, विठ्ठल कोळेकर, यशवंत लवटे, भारत लवटे पाटील, दऱ्याबा गडदे, रविंद्र लवटे, लहू गवंड, धोंडीराम गडदे, पांडुरंग लवटे, संतोष लवटे, आदीं प्रमुख नेते व कार्यकर्त्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्व तसेच कार्यशैली विरुद्ध बंड पुकारून राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. 


या पक्ष प्रवेशात बाबासाहेब करांडे वसंत करांडे बाळासाहेब नरळे सतीश करांडे व प्रमोद लवटे पाटील आदींनी निर्णायक भूमिका बजावली. कोळा व नाझरा जिल्हा परिषद गटात प्राबल्य असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला लागोपाठ हा दुसरा जबर धक्का बसला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी कोळा जिल्हा परिषद गटातील जुजारपूर येथील असंख्य तरुणांनी शेकापला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर लगेच बुध्देहाळ येथील या प्रवेशानंतर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ताकद मजबूत होऊ लागली आहे. याचा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला निश्चितच मोठा फायदा होईल. 


 - कोणत्याही कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग होणार नाही..! गेल्या अनेक वर्षांपासून बुद्धेहाळ व परिसरातील नागरिक आपल्या संपर्कात आहेत दैनंदिन कामानिमित्त वारंवार त्यांच्याशी आपला संपर्क होतो पक्षात नव्यानेच सामील झालेल्या नेते व कार्यकर्त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी आपण सदैव बांधिल राहू आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सन्मानाची वागणूक आणि आदराचे स्थान मिळेल ज्या अपेक्षेने कार्यकर्ते पक्षात सामील झाले आहेत त्या कोणत्याही कार्यकर्त्याचा आपल्याकडून कधीही अपेक्षाभंग होणार नाही याची प्रकर्षाने काळजी घेऊ. 


मा.आम. दिपकआबा साळुंखे-पाटील  प्रदेश उपाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  

  - चौफेर विकासासाठी दिपकआबांची गरज गेल्या अनेक वर्षांपासून गावातील सार्वजनिक प्रश्नांच्या विषयी मी गावातील नागरिकांसमवेत मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांना भेटत आहे. कधीही दिपकआबांनी राजकीय पक्ष, जात-धर्म, विचारधारा यांचा विचार न करता क्षणाचाही विलंब न करता आपली व गावची अनेक कामे मार्गी लावली आहेत. सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण आणि चौफेर विकासासाठी विकास कामात कसलेही राजकारण न करणाऱ्या मा.आम. दिपकआबा सारख्या नेत्याची नितांत गरज आहे.

   गणेश कोळेकर मा उपसरपंच बुद्धेहाळ

Post a Comment

0 Comments