google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पैशांसाठी अल्पवयीन मुलीचा ३ वेळा विवाह ; चौथा प्रयत्न फसला !

Breaking News

पैशांसाठी अल्पवयीन मुलीचा ३ वेळा विवाह ; चौथा प्रयत्न फसला !

 पैशांसाठी अल्पवयीन मुलीचा ३ वेळा विवाह ; चौथा प्रयत्न फसला !

 

भोकरदनमधील म्हाडा कॉलनी परिसरातील १७ वर्षीय मुलीचा तिची आई व भावानेच पैसे घेऊन तीन वेळा बालविवाह करून दिला. चौथ्यांदा बळजबरीने विवाह लावून देण्याची तयारी सुरु असल्याचे समजताच पीडित मुलीने पळ काढून पोलीस ठाणे गाठत सुटका करून घेतली.मुलीच्या तक्रारीवरून आई , एक भाऊ , तीन पतींसह बारा जणांविरुद्ध भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला


नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे . एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे समजते. भोकरदन शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह अंदाजे तीन वर्षांपूर्वी तिच्या आई आणि भावांनी शेंदूर्णी ( ता. जामनेर,जिल्हा जळगाव ) येथील एका मुलाशी पैसे घेऊन लावून दिला होता. तिथं एक महिना राहिल्यानंतर माहेरच्यांनी तिला परत आणले व पुन्हा सासरी पाठविले नाही.


 नंतर आठ महिन्यांनी पुन्हा पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील एका व्यक्तीकडून पैसे घेऊन दुसरा विवाह लावून दिला. येथे तीन महिने राहिल्यानंतर तिच्या भावांनी तिला परत भोकरदनला बोलावून घेतले व त्यानंतर पुन्हा पाच महिन्यांनी भोकरदन शहरातील एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तिसरा विवाह लावला. त्याच्यासोबत पीडित मुलगी औरंगाबाद येथे एक वर्ष राहिली. मात्र, पतीसोबत वाद झाल्याने पीडित मुलगी चार महिन्यांपूर्वी माहेरी भोकरदन येथे आलेली होती.

Post a Comment

0 Comments