google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापुरात प्रणिती शिंदे व सुशीलकुमार शिंदेंचा निषेध रक्त व भक्ताचा वाद पेटला

Breaking News

सोलापुरात प्रणिती शिंदे व सुशीलकुमार शिंदेंचा निषेध रक्त व भक्ताचा वाद पेटला

 सोलापुरात प्रणिती शिंदे व सुशीलकुमार शिंदेंचा निषेध रक्त व भक्ताचा वाद पेटला 



 सोलापूर शहरांमध्ये सध्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या रक्त आणि भक्त या शब्दाने वाद पेटला आहे. या वक्तव्याने आंबेडकर अनुयायी मधुर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती त्याच वेळी आमदार प्रणिती शिंदे यांचे पिता सुशीलकुमार शिंदे यांनी सुद्धा आपल्या कन्येचे समर्थन केले असून त्या ज्या बोलल्या त्यात गैर काय असा उलट सवाल त्यांनी उपस्थित केला.  



माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याचे समर्थन करताच मंगळवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन आमदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.



आमदार प्रणिती शिंदे यांना रक्त पाहिजे की रक्तातला भिमराव पाहिजे हे अगोदर त्यांनी स्पष्ट करावं असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते नाना कदम यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments