2 जानेवारी रोजीची MPSC ची परीक्षा पुढे ढकलली; हे आहे कारण
2 जानेवारी रोजी होणारी MPSCची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या दिवशी परीक्षा होणारे नसल्याची माहिती राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने ट्विटद्वारे माहिती देण्यात आली आहे. अवघ्या चार ते पाच दिवसांवर आलेल्या MPSC परीक्षेसंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने येत्या 2 जानेवारीला MPSC ची होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
परीक्षा पुढे ढकलण्यामागचे कारण हे उमेदवारांचे वय वाढलेल्याने त्यांना संधी मिळावी म्हणून परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.आयोगाने आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात जाहिराती प्रसिद्ध झाल्या नाहीत. तसेच काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली
असल्यामुळे परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे, अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन निर्णयानुसार रविवार, दि. ०२ जानेवारी रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ पुढे ढकलण्यात येत आहे. परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. असे लोकसेवा आयोगाने म्हटले आहे.
0 Comments