google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आता सर्व वाहने पुढील सहा महिन्यात फ्लेक्स इंजिनवर चालणार : नितीन गडकरी

Breaking News

आता सर्व वाहने पुढील सहा महिन्यात फ्लेक्स इंजिनवर चालणार : नितीन गडकरी

 आता सर्व वाहने पुढील सहा महिन्यात फ्लेक्स इंजिनवर चालणार : नितीन गडकरी  



पेट्रोल, डिझेल शंभरीपार गेल्यानं सर्वसामान्यांना त्याचा वापर परवडत नाही. त्यामुळे इंधनाला पर्याय वाहनाला फ्लेक्स फ्यूएल इंजिन अनिवार्य करण्यात येणार आहे.


भारतात आता सर्व गाड्या फ्लेक्स इंजिनवर चालणार असून या महत्त्वाच्या फाईलवर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सही केली आहे.


अनेक दिवसांपासून वाहने बनवणाऱ्या कंपन्याबरोबर गडकरींची चर्चा सुरु होती. मात्र आता 100 टक्के फ्लेक्स इंजिन लावण्याच्या फाईलवर सही केल्याची माहिती खुद्द गडकरी यांनी नागपुरात दिली.



ते 13 वर्ष निरंतर चालत आलेले अॅग्रोव्हिजन हे देशातील कृषी प्रदर्शनांपैकी अग्रणी असणाऱ्या चार दिवसीय प्रदर्शनी व कार्यशाळांचे उद्घाटनप्रसंगी बोलत होते. त्यावेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर देखील उपस्थित होते.



केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, लवकरच चार चारचाकी वाहनांना 100 टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने आणण्याचे लक्ष्य आहे. जर असे झाले तर आपल्याला पेट्रोलची गरज पडणार नाही.



पर्यायी इंधनामुळे आपले लाखो रूपये वाचणार आहे. टीव्हीएस मोटर आणि बजाज ऑटो सारख्या कंपन्यांनी फ्लेक्स इंजिन असणारी दुचाकी आणि तीनचाकी वाहने बनवण्यास सुरूवात देखील केली आहे.



पेट्रोल-डिझेल च्या मोठ्या प्रमाणात आयातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडतोय. तसेच या इंधनांमुळे देशातील प्रदूषणाच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसतोय.



या सर्वांचा विचार करुन केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी काही धोरणं आखली आहेत. 2030 सालापर्यंत देशातील रस्त्यांवर 30 टक्के वाहनं ही इलेक्ट्रिक वाहनं असतील असं सरकारचं ध्येय आहे.

Post a Comment

0 Comments