ऊस बिल मागण्यास गेलेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्याला कारखान्याच्या चेअरमन कडून मारहाण
करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेचा सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे. करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची मागील हंगामातील सुमारे सहा कोटी रुपयांची एफआरपी ची रक्कम थकीत आहे.
FRP ची थकीत रक्कम द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी विजय रणदिवे हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत आज मकाई कारखान्यावर गेले होते. यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची मकाई साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल शाब्दिक यांच्यासोबत शाब्दिक चकमक झाली. एफआरपी संदर्भात विचारणा केल्यावरून संतप्त झालेल्या बागल यांच्याकडून स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे व स्वाभिमानीच्या इतर पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली.
या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. “सत्तेचा हा माज उतरवला जाईल” स्वाभिमानीचा इशारा या मारहाणीबाबत स्वाभिमानीच्या युवा आघाडीचे प्रवक्ते रणजित बागल यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे कि, आज करमाळा येथे ऊसबिलांबाबत जाब विचारण्यासाठी
आमचे करमाळ्याचे पदाधिकारी गेले असता मकाई साखर कारखान्याचा चेअरमन दिग्विजय बागल यांच्याकडून स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे व इतर स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली.
ऊसबिले न देता कारखाना सुरू असल्याबाबत निवेदन देण्यास गेलेल्या आमच्या पदाधिकाऱ्यांना स्वतः व गुंडांकरवी जी मारहाण करण्यात आली याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. विशेष म्हणजे हे चेअरमन शिवसेनेचे नेते आहेत.
मुख्यमंत्री आदरणीय उध्दवजी ठाकरे साहेब आपले मुजोर कार्यकर्ते वेळीच आवरा. सत्तेची ही मस्ती नक्कीच उतरवली जाईल. राज्यभरातील स्वाभिमानीचेकार्यकर्ते आमच्या पदाधिकाऱ्यांसह दिग्विजय बागल यांना याबाबत जाब विचारणार असून त्यांचा सत्तेचा हा माज नक्कीच उतरवला जाईल.
स्वाभिमानीचे सर्व पदाधिकारी विजय रणदिवे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. व दिग्विजय बागलांना नक्कीच शेतकरी व सभासद धडा शिकवतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना युवाआघाडीचे राज्यप्रवक्ते रणजित बागल यांनी दिला आहे.

0 Comments