सोलापूरच्या ग्रामीण भागात करणार ग्रामपंचायत स्तरावर सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना ही सक्ती
सोलापूर : कोरोनाच्या ओमिक्रोन या नव्या व्हेरियंटने सर्वत्र भीतीचे वातावरण तयार केले आहे. भारतामध्ये ओमीक्रोनच्या रुग्णांची संख्या दहा वर गेली आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबई मध्ये रुग्ण आढळल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्यात पहिलीपासूनच्या शाळा सुरू झाल्या आहेत, शहरी भागात महानगरपालिकेने विद्यार्थ्यांच्या आईवडिलांचे लसीकरण झालेले सर्टिफिकेट बंधनकारक केले आहे अन्यथा त्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये बसवले जात नाही.
दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा केली असता कोरोणा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण आणि तोंडाला मास्क हे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील लसीकरणाची संख्या पाहता लसीकरण वाढावे म्हणून ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी आता पालकांचे लसीकरण बंधनकारक करण्यात येणार आहे, याचबरोबर ग्रामपंचायत स्तरावर सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या गावातील लसीकरण करून घ्यावे अन्यथा संबंधित ग्रामपंचायतीला जबाबदार धरून सरपंचावर कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला.

0 Comments