google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दोन दिवसांमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करावे , अन्यथा आमरण उपोषण करु : शिवाजी बापू घेरडे सांगोला तालुक्यातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे कोटी रुपयांचे नुकसान

Breaking News

दोन दिवसांमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करावे , अन्यथा आमरण उपोषण करु : शिवाजी बापू घेरडे सांगोला तालुक्यातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे कोटी रुपयांचे नुकसान

 दोन दिवसांमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करावे , अन्यथा आमरण उपोषण करु : शिवाजी बापू घेरडे सांगोला तालुक्यातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे कोटी रुपयांचे नुकसान



सांगोला / प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपूर्वी सांगोला तालुक्यासह सोलापूर , सांगली नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर अवकाळी पावसाने झोडपून काढले . या अवकाळी पावसामुळे मात्र फळ बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले . या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे मात्र सांगोला तहसील कडून कोणत्याही स्वरूपाचे पंचनामे अद्याप पर्यंत करण्यात आलेले नाहीत . 



यामुळे शेतकरी आत्महत्या करण्याच्या तयारीत असताना सुद्धा प्रशासन याची दखल का घेत नाही म्हणूनच येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांचे पंचनामे नाही केल्यास तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून सांगोला तहसील समोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती लोकनेते शिवाजी ( बापू ) घेरडे यांनी दिली आहे . सोलापूर जिल्ह्याच्या बाजूलाच सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीला पंचनामे चालू आहेत . परंतु सोलापूर जिल्ह्यात उद्यापपर्यंत एकाही ठिकाणी पंचनामे केले नाहीत . यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .



 सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक , कोळा , जुनोनी , जवळा , हंगिरगे , अजनाळे या ठिकाणी 

१०० % द्राक्ष बागायती अवकाळी पावसामुळे गेल्या आहेत . या अवकाळी पाऊस झाल्यामुळे द्राक्ष बागायत मोठ्या संकटात आले असून



तहसीलदारांनी तलाठ्यांना लगेच पंचनामा करण्याचे आदेश देणे अपेक्षित होते परंतु अशी कोणतीही कार्यवाही सांगोला तहसील कडून झाली नाही . सांगोला सारख्या दुष्काळी पट्ट्यात शेतकऱ्यांनी फुललेल्या फळबागांना मात्र मोठा फटका बसला आहे . याकडे तहसीलदार यांनी कोणत्याही स्वरूपाचे पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत . यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत शासनाच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या शिवाय पर्याय नाही . कोट्यावधी 



रुपयांची द्राक्ष बागेचे नुकसान झाले असून नुकसानी शेतकऱ्यांना सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष कलेक्टर यांनीसुद्धा हे पंचनामे करण्यासाठी कुठेतरी कुचराई केली म्हटले तरी वावगे ठरणार नाही . शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नंतरच हे प्रशासकीय अधिकारी आदेश देणार का ? की आणि कोणाची वाट बघणार असाही यावेळी नागरिकांमध्ये सवाल बोलला जात आहे ? यामुळे प्रशासनाने तातडीने तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या फळबागांचे पंचनामे करून मदत मिळवून द्यावी अशी मागणी घेरडे यांनी केली आहे .

Post a Comment

0 Comments