सोलापूर जिल्ह्यातील या भागात तीन दिवस दारू विक्री बंद राहणार
महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम वरील वाचले 1 नुसार जाहिर करण्यात आलेला आहे. तसेच सोलापुर जिल्ह्यातील 5 नगरपंचायतीच्याही निवडणुका होणार आहेत. त्यास अनुसरुन सोलापुर जिल्ह्यातील 148 ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये तसेच 2 नगर पंचायती (माढा, माळशिरस) तसेच तीन नविन नगरपंचायती (महाळुंग-श्रीपुर, वैराग, नातेपुते) या ठिकाणी दिनांक 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर दिनांक 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे.
सदर निवडणुका शांततेत तसेच निर्भय व नि:पक्षपाती वातावरणात होणेसाठी व कोठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये यास्तव महाराष्ट्र मद्यनिषेध कायदा 1949 च्या कलम 142 अन्वये सोलापुर जिल्ह्यातील 148 ग्रामपंचायती व पाच नगर पंचायतीमध्ये मतदान तसेच मतमोजणी प्रक्रिया होणार आहे.
त्या ठिकाणी असलेल्या सर्व एफएल-1,सीएल-2,नमुना ई, एफएलडब्यु-2, नमुना ई,सीएल-3,एफएल-3, एफएलबीआर-2, एफएल-4, तात्पुरती क्लब अनुज्ञप्ती, टीडी-1 अनुज्ञप्ती दिनांक 20 डिसेंबर 2021 सोमवार व 21 डिसेंबर 2021 मंगळवार-मतदानाच्या पूर्वीचा दिवस-संपुर्ण दिवस-148 ग्रामपंचायतीमध्ये तसेच माढा, माळशिरस,महाळुंग-श्रीपुर, वैराग व नातेपुते या नगर पंचायतीमध्ये निवडणुक होणार आहे असे ग्रामपंचायत व नगरपंचातीचे क्षेत्र .
दिनांक 22 डिसेंबर 2021 बुधवार-मतमोजणीचा दिवस-संपुर्ण दिवस- ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणच्या क्षेत्रात बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिले.
उपरोक्त आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबधीत अनुज्ञप्तीवर निलंबित अथवा रद्य करणे अशी कडक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच सदर कालावधीत सोलापुर जिल्ह्यातील सर्व विदेशी व वाईन निर्माणी कदयाचे उत्पादन करु शकतील परंतु सदरहु कालावधीत अनुज्ञप्त्या बंद असलेल्या कार्यक्षेत्रातील अनुज्ञप्तीधारकांना मदयाचा पुरवठा करता येणार नाही, याची दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिले.

0 Comments