google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आज राज्यात पावसाचा जोर वाढला , या जिल्ह्यांसाठी

Breaking News

आज राज्यात पावसाचा जोर वाढला , या जिल्ह्यांसाठी

 आज राज्यात पावसाचा जोर वाढला , या जिल्ह्यांसाठी 


आग्नेय अरबी समुद्र  आणि लगतच्या लक्ष्यद्वीप बेट समूह ते उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण , मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. आज दिवसभरात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा  देण्यात आला आहे. तसंच उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात  सर्व ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचवेळी थायलंड परिसरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागर आणि अंदमान समुद्रात आले असून त्याचे येत्या दोन दिवसात चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. ते चक्रीवादळ 4 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत धडकण्याची शक्यता आहे.

आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार

आजपासून राज्यात आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.


 पुढील दोन दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने येत्या तीन दिवसांसाठी कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा परिसरात बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बुधवारी मुंबई पुण्यासह 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

ऑरेंज अलर्ट

हवामान खात्याने आज एकूण 17 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट  जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाजही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

उद्याही राज्यात पाऊस

3 डिसेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments