आमदार शहाजीबापू पाटील यांची सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीवर निवड.
सांगोला (वार्ताहर)सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीमध्ये
विशेष निमंत्रित सदस्य म्हणून आमदार शहाजीबापू पाटील यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय क्र. डिएपी-२०२१/प्र. क्र.५७/१४८१- अ दि.५ नोव्हेंबर २०२१ रोजी च्या अध्यादेशानुसार ही निवड जाहीर झाली आहे जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचे नियोजन करण्यासाठी सदरची समिती असून यामध्ये पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्य करणार असून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यासह एकूण नऊ सदस्यांचा समावेश आहे.

0 Comments