ST महामंडळाच्या विलीनीकरणाची मागणी अयोग्य अजित पवार
राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आता आठवडाभरापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. राज्य सरकारशी झालेल्या चर्चा निष्फळ ठरत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाबद्दल एक महत्वाचं विधान केलं आहे. कार्तिकेय एकादशीसाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढरपुरात होते. यावेळी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधत राज्यातल्या महत्वाच्या घडमोडींवर आपली प्रतिक्रीया दिली.
राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करण्याची मागणी घेऊन संप पुकारला आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या संपावर अजूनही तोडगा निघू शकलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर बोलताना सांगितलं की, एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीणीकरण करण्याची मागणी ही अयोग्य आहे. त्यामुळे आता राज्य शासन या मागणीबद्दल सकारात्मक नसल्याचं समजतं आहे.
दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत विलीनीकरण शक्य नसल्याचं सांगितलं. त्यामुळे एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून, जो पर्यंत राज्य शासनात विलीनीकरण नाही तो पर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
0 Comments