google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अक्कलकोटहून येणाऱ्या प्रवासी जीपचा टायर फुटला ; 5 ठार तर अनेक जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

Breaking News

अक्कलकोटहून येणाऱ्या प्रवासी जीपचा टायर फुटला ; 5 ठार तर अनेक जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

 अक्कलकोटहून येणाऱ्या प्रवासी जीपचा टायर फुटला ; 5 ठार तर अनेक जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक 


 सोलापूरः अक्कलकोट वरून सोलापूरला येणारे प्रवासी जीपचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार तर अनेक प्रवासी जखमी झालेत ही घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास अक्कलकोट रोड वरील गंगाप्रसाद पेट्रोल पंपासमोर झाला.


सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने एसटी बंद आहेत त्यामुळे प्रवासी जीप मधून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होत आहे प्रमाणाच्या बाहेर प्रवासी जीप मध्ये भरले जात आहेत त्याच कारणाने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मंगळवारी अक्कलकोट वरून एम एच 13 ए एक्स 1237 क्रमांकाची प्रवासी जीप निघाली गंगाप्रसाद पेट्रोल पंपा समोर आली असता या जीपचे पुढचे टायर फुटले आणि जीप पलटी झाली त्यामध्ये अनेक प्रवासी रस्त्याच्या बाहेर फेकले गेले पाच जण तर रस्त्यावर पडून जागीच ठार झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन दाखल झाले त्यांनी सिव्हील हॉस्पिटल मधून ॲम्बुलन्स मागून घेतल्या जखमीना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.


या अपघातात आणि प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मयतामध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे तर 2 गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. इतर जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, मयतांची अद्याप ओळख पटली नाही. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी हा अपघात एसटी बंद असल्याने  झाला असून एसटी महामंडळाला दोष देत त्यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण रस्त्याचे काम संथ गतीने करत असल्याचा आरोप केला आहे.

Post a Comment

0 Comments