google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गणपतरावांची 'देशमुखी' कुणाकडे ? अनिकेत कि बाबासाहेब ?

Breaking News

गणपतरावांची 'देशमुखी' कुणाकडे ? अनिकेत कि बाबासाहेब ?

 गणपतरावांची 'देशमुखी' कुणाकडे ? अनिकेत कि बाबासाहेब ? 


सांगोला : सांगोला आणि गणपतराव देशमुख हे कधीही न संपणारे समीकरण. कारण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आजपर्यंत सांगोल्याच्या राजकारणात गणपतराव देशमुख म्हणतील तीच उजवी दिशा अस होतं. तब्बल १३ विधानसभा निवडणुका लढून ११ निवडणुका जिंकलेले, तब्बल ५५ वर्षे तालुक्याच प्रतिनिधित्व केलेले गणपतराव पहिल्यांदाच सांगोल्यात नसतील. गणपतराव असतानाच गणपतराव देशमुख यांच्यानंतर तालुक्यात शेकापची धुरा कोण सांभाळणार अशा चर्चा होत्या. त्यात २०१९ च्या विधासभा निवडणुकीत गणपतराव देशमुख यांनी निवडणूक न लढण्याचे जाहीर केले आणि त्यांचा वारसा म्हणून अनिकेत देशमुख यांच्याकडे विधानसभेची धुरा आली.


थोड्याश्या मताने अनिकेत यांचा पराभव झाला. पराभवानंतर अनिकेत तालुक्याच्या राजकारणात पूर्णवेळ सक्रीय राहतील अशी शक्यता असताना ते दीर्घकाळ पुन्हा मतदारांपासून दूर राहिले. याच काळात गणपतराव देशमुख यांचेच दुसरे नातू बाबासाहेब देशमुख अचानक तालुक्यात सक्रीय झाले. कोलकत्त्यामधून सुरुवातीला फोन वरून कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवणारे बाबासाहेब नंतर पूर्णवेळ तालुक्यात सक्रीय झाले. बाबासाहेब पूर्णवेळ सक्रीय झाल्यानंतर शेकापची पताका खांद्यावर घेवून फिरणारे कार्यकर्ते कोड्यात पडले.

अनिकेत कि बाबासाहेब.

सध्या बाबासाहेब पूर्णपणे राजकीय बाजू सांभाळत असले तरी अनिकेत देशमुखही सक्रीय होत आहेत. सामुहिक नेतृत्वाच्या कितीही चर्चा केल्या तरी विधानसभा कोण लढणार हा प्रश्न असणार आहे. कदाचित २०२४ च्या विधानसभा निवडणुकीला खूप वेळ असला तरी त्याची पायाभरणी आतापासून करावी लागेल. हेही तेवढच खरं.

Post a Comment

0 Comments