google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मैत्रीणीच्या घरी चोरी करणाऱ्या महिलेस अटक करुन सातारा शहर पोलीस ठाणे केले जरबंद

Breaking News

मैत्रीणीच्या घरी चोरी करणाऱ्या महिलेस अटक करुन सातारा शहर पोलीस ठाणे केले जरबंद

 मैत्रीणीच्या घरी चोरी करणाऱ्या महिलेस अटक करुन सातारा शहर पोलीस ठाणे केले जरबंद


 दि . १३/१०/२०२१ रोजी सकाळी ०७.३० वा . ते ० ९ .३० वा . दरम्यान अर्चना अपार्टमेन्ट , समोर गुरुवार पेठ , सातारा येथे फिर्यादी याचे रहाते घरातील बेड रुम मध्ये असलेले लाकडी कपाटातील साड्यांच्या घडी मध्ये ठेवलेले ज्वेलरी बॉक्स मधील सोन्याचे राणीहार , दोन तोळे वजनाचे ८०,००० / - रु . किमतीचे व सव्वादोन तोळे वजनाचे साखळीमध्ये काळे मनी असलेले सोन्याचे गंठन ८०.००० / - रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असे सुमारे १.६०,००० / - रुपये किमतीचे दागिने कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केल्याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली होती . सदरबाबत सातारा शहर पेलीस ठाणेत गुरन ९९ ८ / २०२१ भादविस कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे . त्याबाबत त्या अनुषांगाने सदर पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेतली असता सातारा हद्दीत घरफोडी जास्त प्रमाणात वाढल्या होत्या 


त्यानुसार मा.पोलीस अधिक्षक सो अजयकुमार बन्सल , मा अपर पोलीस अधिक्षक सो अजय बो - हाडे , मा सहा पोलीस अधिक्षक सो दलाल मॅडम पोलीस निरीक्षक श्री भगवान निंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री समीर कदम यांचे पथाकातील कर्मचारी यांनी सातारा शहर हद्दीत वेळोवेळी पेट्रोलिंग करुन व बातमीदारांशी वेळोवेळी संपर्क करुन गोपनियरित्या संशयीतांची माहिती मिळवून महिल नामे सिमा संजय कोकरे वय ४० वर्षे.रा.केसरकर पेठ सातारा हिस ताब्यात घेतले . सदर महिला आरोपीवर यापूर्वी देखील मुंबई , तसेच सातारा शहर , शाहुपूरी , सातारा तालुका पोलीस ठाणे अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत . सदर महिला हि सराईत गुन्हेगार असून तिने चौकशी दरम्यान उडवाउडवीची उत्तरे दिली परंतू तिचेवर महिला पोलीसांसमक्ष कौशल्यपूर्वक विचारपूस करून प्रश्नांचा भडीमार केल्याने तिने अखेर गुन्हयाची कबुली देवून गुन्हयात चोरलेला सोन्याचे गंठण , राणी हार असा सव्वा चार तोळे वजनाचे १,८०,००० / - रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करून जात ते गुन्हयाचे कामी जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे . 


सदर कारवाईमध्ये मा.पोलीस अधिक्षक सो अजयकुमार बन्सल , मा अपर पोलीस अधिक्षक सो अजय बो - हाडे , मा सहा पोलीस अधिक्षक सो आंचल दलाल मॅडम पोलीस निरीक्षक श्री भगवान निंबाळकर , मा.पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर मॅडम , महिला पो.उपनिरीक्षक श्री . जाधव मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक श्री समीर कदम पो.ना. सुजित भोसले , पोना अविनाश चव्हाण , पोना पकंज ढाणे , पोना ज्योतीराम पवार पोशि अभय सावळे , गणेश घाडगे , संतोष कचरे विशाल धुमाळ • सागर गायकवाड , विक्रम माने यांनी सहभाग घेतला . " तसेच या गुन्हयाचा पुढील तपास पोना ४ ९ २ भिसे हे करीत आहेत . प्रति . सर्व संपादक . मा . भगवान निंबाळकर व.पो. नि . सातारा शहर

Post a Comment

0 Comments