वीजचोरीविरुद्ध कारवाई करताना अधिकारी , कर्मचाऱ्यांना मारहाण चोपडी येथील घटना : दोघा शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा
सांगोला बेकायदेशीरपणे आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्यांचे आकडे काढत असताना अधिकारी व कर्मचाऱ्याला विरोध करून शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण करण्याचा प्रकार चोपडी ( ता . सांगोला ) येथे गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास घडला . या प्रकरणी दोन शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे . आबासाहेब महादेव जरग व बजरंग ज्ञानेश्वर जरग अशी गुन्हा नोंदलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत . वीजचोरीविरुद्ध नाझरे ( ता . सांगोला ) येथील वीज वितरण कंपनीचे वायरमन अजय सदाशिव गरांडे हे गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास वरिष्ठांच्या आदेशानुसार विशेष कारवाई मोहिमेअंतर्गत शाखा अभियंता डी . आर . मेनकुदळे व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांसमवेत नाझरे सेक्शनमधील चोपडी शिवारात फिरून तारेवर चोरून टाकलेल्या आकड्यांचा शोध घेऊन ते काढून टाकीत होते . यावेळी ही घटना घडली . याबाबत , वायरमन अजय सदाशिव गरांडे यांनी फिर्याद दिली .
0 Comments