google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सातारा - कोल्हापूर , मिरज कुर्डुवाडी पॅसेंजर ' या ' तारखेपासून सुरू होणार

Breaking News

सातारा - कोल्हापूर , मिरज कुर्डुवाडी पॅसेंजर ' या ' तारखेपासून सुरू होणार

 सातारा - कोल्हापूर , मिरज कुर्डुवाडी पॅसेंजर ' या ' तारखेपासून सुरू होणार


मिरज - कुर्डुवाडी पॅसेंजर मिरजेतून दररोज सकाळी 6.25 वाजता सुटेल . कुर्डुवाडी येथे सकाळी 10.15 वाजता पोहोचेल . कुर्डुवाडी येथून सकाळी 10.55 वाजता सुटेल . मिरजेत दुपारी 3.10 वाजता येईल . पॅसेंजर गाड्या सुरू झाल्यामुळे सातारा , सांगली , कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे .मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने सातारा कोल्हापूर आणि मिरज - कुर्डुवाडी पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे . सातारा - कोल्हापूर पॅसेंजर ही सातारा येथून पहाटे 5.30 वाजता सुटेल . ती मिरजेत सकाळी 8.25 वाजता येईल . कोल्हापूर येथे 9.55 वाजता पोहोचेल . कोल्हापूर - सातारा पॅसेंजर कोल्हापूर स्थानकातून दुपारी 4.55 वाजता सुटेल , मिरजेत सायंकाळी 5.45 वाजता येईल . सातारा येथे रात्री 10.50 वाजता पोहोचेल .कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून बंद झालेली सातारा - कोल्हापूर आणि मिरज - कुर्डुवाडी पॅसेंजर तब्बल अडीच वर्षानंतर सुरू होत आहे . मिरज कुर्डुवाडी पॅसेंजर सोमवार ( दि . 15 ) पासून तर सातारा - कोल्हापूर पॅसेंजर मंगळवार ( दि . 16 ) पासून नियमीत वेळेत धावणार आहे .

Post a Comment

0 Comments