शासनमान्य "पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र" संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी भगवान वानखेडे यांची निवड
भगवान वानखेडे हे गेल्या 3 वर्षांपासून या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत होते. त्यांच्या प्रामाणिक कार्याची दखल घेऊन आता सोलापूर जिल्ह्यानंतर सबंध पश्चिम महाराष्ट्रात संघटनेचे कार्य विस्तार करण्याची धुरा त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
सोलापूर जिल्हाध्यक्ष पदावर असतानासंघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विनोद पत्रे, राज्य सचिव श्री.अनिल चौधरी व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पत्रकारांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवून त्यांच्या मदतीला धावून गेलो. लॉकडाऊन काळात संघटनेमार्फत पत्रकार बांधवांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य पुरवले. यासाठी पंढरपूर सह जिल्ह्यातील अनेक पत्रकार बांधवांची व विविध क्षेत्रातील मान्यवरांची तसेच प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेतेमंडळी यांची मोलाची साथ लाभली. संघटनेच्या वरिष्ठांनी आता नव्याने सोपवलेली जबाबदारीही तेवढ्याच जोमाने व निष्ठेने पार पाडीन. असा विश्वास भगवान वानखेडे यांनी व्यक्त केला.
पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून पत्रकार बांधवांना संघटीत करण्यासाठी लवकरच सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांच्या निवडी करण्यात येतील, अशी माहिती संघटनेचे नुतन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान वानखेडे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
0 Comments