google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डी.व्ही.पी. ग्रुपच्या माध्यमातून सांगोला साखर कारखाना दुष्काळी तालुक्यात कृषीक्रांती घडवून आणेल : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

Breaking News

डी.व्ही.पी. ग्रुपच्या माध्यमातून सांगोला साखर कारखाना दुष्काळी तालुक्यात कृषीक्रांती घडवून आणेल : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

 डी.व्ही.पी. ग्रुपच्या माध्यमातून सांगोला साखर कारखाना दुष्काळी तालुक्यात कृषीक्रांती घडवून आणेल : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील 


अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सांगोला कारखान्याचा गळीत हंगाम अखेर सुरू

सांगोला : तालुका प्रतिनीधी गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना धाराशिव उद्योगसमूहाने भाडेतत्वावर चालविण्यास घेतला आहे. महाविकास आघाडी सरकार दुष्काळी सांगोला तालुक्यातील शेतीला पाणी देण्यास कटिबद्ध आहे. त्यामुळे आगामी काळात डी.व्ही.पी. ग्रुप धाराशिव साखर कारखाना हा सांगोला तालुक्यात कृषी क्रांती घडवून आणेल असा विश्वास राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.



सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना तथा धाराशिव साखर कारखाना युनिट 4 च्या प्रथम गळीत हंगाम मोळी पूजन कार्यक्रमास सहकार मंत्री रविवार 17 ऑक्टो. रोजी वाकी (शि.) ता. सांगोला येथे आले होते. यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधताना ते बोलत होते. या मोळी पूजन समारंभास धाराशिवचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.आम.दिपकआबा साळुंखे पाटील शेतकरी कामगार पक्षाचे चंद्रकांत देशमुख, अनिकेत देशमुख, धाराशिव उद्योग समूहाचे प्रमुख अभिजीत पाटील, मनसेचे राज्याचे नेते दिलीप धोत्रे, तानाजीकाका पाटील, विजय पवार आदींसह सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक तसेच धाराशीव उद्योग समूहाचे सर्व संचालक तसेच सभासद शेतकरी उपस्थित होते.


पुढे बोलताना ना.पाटील म्हणाले, राज्याच्या नकाशावर सांगोला तालुक्याची ओळख जरी दुष्काळी तालुका म्हणून असली तरीही महा विकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील व मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सातत्याने सांगोला तालुक्यातील रखडलेल्या सिंचन प्रश्नाबाबत पाठपुरावा करून तालुक्याच्या चारी बाजूंनी पाणी पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. आजपर्यंत तालुक्यात पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी डाळिंब द्राक्ष अशा फळे पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करत होते गेल्या काही वर्षांपासून सातत्याने डाळिंब फळबागा अडचणीत असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी शाश्वत पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऊस शेतीकडे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. कारखानदारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उसाला शासनाने निश्चित केलेली


 आधारभूत किंमत मिळेल आणि खऱ्या अर्थाने आजपर्यंत दुष्काळाची झगडत असलेल्या सांगोला तालुक्यात यापुढील काळात कृषीक्रांती घडून येईल. यासाठी राज्याचा सहकार व पणनमंत्री म्हणून मी नेहमीच आमदार शहाजीबापू पाटील व मा.आम दिपकआबा साळुंखे-पाटील व तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू असा विश्वास शेवटी ना.बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. तर आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या खास शैलीत यावेळी फटकेबाजी करत सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना तथा धाराशिव साखर कारखाना चालविताना आपण अजिबात त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही हा कारखाना चालविताना आपणास अजिबात राजकीय अडचण येणार नाही व प्रशासनाने बोलावल्याशिवाय आपण कारखाना परिसरात पायही ठेवणार नाही असे सांगितले.


यावेळी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर, आमदार कैलास पाटील, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, चेअरमन मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील, चंद्रकांत देशमुख, अनिकेत देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना सुरू झाला त्याबद्दल आनंद व्यक्त केला. या पुढील काळात सांगोला तालुक्यातील ऊस उत्पादक आणि सभासद शेतकऱ्यांना धाराशिव उद्योगसमूहाने न्याय द्यावा यासाठी आम्ही आपणास सर्वतोपरी सहकार्य करू असेही नेतेमंडळींनी कारखाना प्रशासनास आश्वस्त केले


1) कारखाना सुरू करण्यात दिपकआबांचा निर्णायक पाठपुरावा 

गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी मी सहकार व पणन खात्याचा पदभार स्वीकारल्यापासून सातत्याने माझ्याकडे कारखान्याचे चेअरमन व माझे सहकारी मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. काहीही करा परंतु सांगोला चा कारखाना लवकरात लवकर सुरू झाला पाहिजे असा त्यांचा नेहमी आग्रह असायचा. अखेर त्यांच्या, सर्व संचालक मंडळाच्या व सांगोला तालुक्यातील सर्व जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण झाली व कारखाना सुरळीतपणे सुरू झाला. कारखान्याच्या प्रगतीसाठी जे आवश्यक आहे तेच सहकार्य करण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू :


मा.ना. बाळासाहेब पाटील

सहकार व पणनमंत्री महाराष्ट्र राज्य

2) अखेर तो "सोनियाचा दिस" आज उजाडला 

दुष्काळी भागात सहकारी साखर कारखाने चालविणे अत्यंत जिकिरीचे आणि आव्हानात्मक काम आहे अशा परिस्थितीत सांगोला सहकारी साखर कारखाना चालविण्याची जबाबदारी सभासद शेतकऱ्यांनी चेअरमन म्हणून माझ्यावर दिली होती उसाच्या टंचाईमुळे गेल्या काही वर्षे सांगोला साखर कारखाना बंद असला तरीही कारखाना सुरू करण्याची नैतिक जबाबदारी माझ्यावर कायम होती सभासद शेतकरी व सामान्य जनतेच्या या अपेक्षेला जागत आपण देशाचे नेते शरदचंद्रजी पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सहकार पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा हा राजमहाल चालविण्यासाठी धाराशिव उद्योग समूहाला भाडेतत्त्वावर दिला आहे गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या कारखान्याचा बॉयलर अखेर पेटल्याने सांगोला तालुक्यातील ऊस उत्पादक व सर्व सभासद शेतकरी यांच्या स्वप्नातील "सोनियाचा दिस" खऱ्या अर्थाने आज उगवला

मा.आम दिपकआबा साळुंखे-पाटील 

चेअरमन,सां.ता.सह.साखर कारखाना

Post a Comment

0 Comments