नुसता रामजप नको, जातीयता, अंधश्रद्धेच्या रावणाचे दहन हवे -सतीश भिडे
क्रांतिकारकांच्या मनातील भारत अखंड व्हावा असे वाटत असेल, तर रामनाम जपा बरोबर जातीयता अंधश्रद्धे च्या रावणाचे दहन करण्याचे भावनिक आवाहन स्वा. वीर सावरकर चरित्र गायक सतीश भिडे ह्यांनी वापी येथे केले.
स्वा. वीर सावरकर ह्यांचे जीवनावरील गीत वीर विनायक चा 2802 कार्यक्रम मराठी भाषिक मंडलिंपुढे सादर करताना भिडे ह्यांनी ब्राह्मण्य जन्मावर नसून, सत्कर्मावर अवलंबून आहे असे सांगितले.
कार्यक्रमास तबला साथ हरीश झानजे ह्यांची लाभली होती. जेष्ठ सामाजिक नेते विनोद कदम,सुनील अहिरे, चेतन गुंजाळकर कार्यक्रमास उपस्थित होते.
0 Comments