औरंगाबाद शहरात एका प्राध्यापकाच्या विचित्र खूनाच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.औरंगाबाद शहरातील एका महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापकाची राहत्या घरात गळा चिरून आणि हाताच्या नसा कापून निर्घृण हत्या केल्याची खळबळजन घटना समोर आली आहे. ही घटना औरंगाबाद शहरातील सिडको एन 2 भागात उघडकीस आली आहे. डॉ. राजन हरिभाऊ शिंदे असे खून झालेल्या प्राध्यपकाचं नाव आहे. मागील 12 तासामध्ये खूनाची ही दुसरी घटना असून या घटनांमुळे शहर हादरुन गेलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्राध्यापक डॉ. शिंदे हे औरंगाबाद शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयात इंग्रजी विषय शिकवतात. आज (सोमवार) पहाटे त्यांचे कुटुंबीय झोपेतून उठले असता, प्राध्यापक शिंदे हे घरातील हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. हा प्रकार पाहताच कुटुंबीयांची पाया खालची जमीनच सरकरली. यानंतर या घटनेची माहिती सिडको पोलीस ठाण्यात देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
महत्त्वाचे म्हणजे घरातील कोणतीही किमती वस्तू चोरीला गेलेली नाही.
त्यामुळे ही हत्या कोणत्या कारणामुळे करण्यात आली, याचा तपास सिडको पोलीस करीत आहेत. मारेकऱ्याने मृत प्राध्यापकाचा गळा चिरुन त्यांच्या हाताच्या नसा कापल्या आहेत.रात्रभर झालेल्या रक्तस्त्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments