प्रभाग क्र. 4 मध्ये आज कोरोना लसीकरणाचे आयोजन
सांगोला/प्रतिनिधी :सांगोला शहरात जास्तीत जास्त नागरिकांना मोफत कोरोना लसीचा लाभ व्हावा व सांगोला शहर शंभर टक्के कोरोना मुक्त व्हावे यासाठी शहरातील प्रभाग क्र. 4 मध्ये नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोना लसीकरणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तेथील स्थानिक नगरसेवक अस्मिरभाई तांबोळी व नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी यांनी दिली आहे.
संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजविला असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात मोफत कोरोना लसीकरणाची मोहीम राबविली आहे. कोरोना लसीचा मुबलक साठा उपलब्ध झाला असला तरी काही लोक या लसीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे प्रभाग क्र. 4 मधील सर्व नागरिकांसाठी आज मंगळवार दि. 12 रोजी सकाळी 10 ते सायं.4 वाजेपर्यंत जि. प. शाळा नं- 3 व कुंभार गल्ली समाजमंदिर याठिकाणी मोफत कोरोना लसीकरणाचे आयोजन केले आहे. तरी प्रभागातील व शहरातील ज्यांनी कुणी कोरोना लस घेतलेली नाही अशा तरुण, तरुणी, महिला, वयोवृद्ध यांनी उपस्थित राहून जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे. लसीकरणासाठी येताना सोबत ओळखपत्र, आधार कार्ड, मोबाईल घेऊन यावे.
0 Comments