google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 हरीश बैजलब्रेकींग ! नवे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी पदभार घेतला ; म्हणाले गुन्हेगारीवर "अंकुश" कायम राहील

Breaking News

हरीश बैजलब्रेकींग ! नवे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी पदभार घेतला ; म्हणाले गुन्हेगारीवर "अंकुश" कायम राहील

हरीश बैजलब्रेकींग ! नवे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी पदभार घेतला ; म्हणाले गुन्हेगारीवर "अंकुश" कायम राहील


सोलापूर : सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदी महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक हरीश बैजल यांची शुक्रवारी नियुक्ती झाली होती. तसा राज्याच्या गृह विभागाने आदेश काढला होता.  सोमवारी सायंकाळी हरिश बैजल यांनी पदभार घेतला आहे.विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पदोन्नतीवर जात असलेले अंकुश शिंदे यांच्या हस्ते नूतन पोलीस आयुक्त हरिश बैजल यांनी पदभार स्वीकारला.अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे तसेच पोलिस उप महानिरीक्षक हरिष बैजल या दोघा बड्या पोलिस अधिका-यांचा शुक्रवारी झालेल्या बदल्यात समावेश होता.


सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. अंकुश शिंदे यांना विशेष पोलीस महानिरीक्षक सुधार सेवा मुंबई या ठिकाणी पदोन्नती मिळाली, सोलापूर शहरचे अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची ऑगस्ट महिन्यात पोलिस आयुक्त (सोलापूर शहर) म्हणून करण्यात आलेली बदली रद्द करण्यात आली आहे. तसेच कराळे यांनी सोलापुरात येण्यास टाळाटाळ करीत नापसंती दर्शवल्याने हरिश बैजल यांची नियुक्ती झाली आहे. मात्र यामुळे अंकुश शिंदे यांना काही दिवस सोलापुरात थांबावे लागले.पोलिस उप महानिरीक्षक हरीश बैजल यांची सायबर व म.अ.प्र., महाराष्ट्र राज्य, मुंबई येथून सोलापूर शहर पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांची ठाणे शहर येथे असलेली आदेशाधीन बदली रद्द करण्यात आली असून त्यांची नियुक्ती पुणे पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेत झाली आहे.

Post a Comment

0 Comments