google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मागासवर्गीय वस्त्यांसाठी एक कोटीचा निधी मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील

Breaking News

मागासवर्गीय वस्त्यांसाठी एक कोटीचा निधी मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील

मागासवर्गीय वस्त्यांसाठी एक कोटीचा निधी मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील


     आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत कामे मार्गी.

सांगोला/शब्दरेखा एक्सप्रेस न्युज. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सांगोला तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती अंतर्गत १० गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीतील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे, पेविंग  ब्लॉक बसवणे, बंदिस्त गटार बांधणे, हायमास्ट बसविणे व रस्ता कॉंक्रिटीकरण करणे अशा ३१ विविध विकास कामांना निधी मंजूर होण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय यांच्याकडे आमदार शहाजीबापू पाटील यांनी पाठपुरावा केल्याप्रमाणे एक कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

            मंजुर कामांची नावे

१. किडबिसरी येथील साबळे हातेकर वस्ती येथे सिमेंट पाईप गटार करणे. मंजूर रक्कम ३.३० लक्ष 

२. किडबिसरी येथील डाळे हातेकर वस्ती येथे सिमेंट पाईप गटार बांधणे. मंजूर रक्कम ३.३० लक्ष

३. किडबिसरी येथील बापू साबळे यांचे घराजवळ हायमास्ट बसविणे. मंजूर रक्कम ३.३० लक्ष

४. किडबिसरी येथील कल्याणनगर ऐवळे वस्ती येथे हायमास्ट बसविणे. मंजूर रक्कम ३.३० लक्ष

५. कोळे येथील अमोल लक्ष्मण मोरे घर ते दुर्वा कृष्णा मोरे घरापर्यंत पेविंग ब्लॉक बसविणे. मंजूर रक्कम ३.३० लक्ष

६. कोळे येथील डोंबरी रस्ता ते सुरेश बायणे घरपर्यंत पेविंग ब्लॉक बसविणे. मंजूर रक्कम ३.३० लक्ष

७. लोणविरे मागासवर्गीय वस्ती येथे हायमास्ट बसविणे. मंजूर रक्कम ३.३० लक्ष

८. वाटंबरे मागासवर्गीय वस्ती येथे हायमास्ट बसवणे. मंजूर रक्कम ३.३० लक्ष

९. शिरभावी केराप्पा कांबळे वस्ती ते भातुंगडे वस्ती रस्ता खडीकरण करणे. मंजूर रक्कम ३.३० लक्ष

१०. शिरभावी आप्पा कांबळे वस्ती ते नाना कांबळे वस्ती रस्ता खडीकरण करणे. मंजूर रक्कम ३.३० लक्ष

११. शिरभावी मोहन पवार वस्ती ते भारत होवाळ वस्ती रस्ता खडीकरण करणे. मंजूर रक्कम ३.३० लक्ष

१२. शिरभावी तुकाराम होवाळ घर ते भारत होवाळ घरापर्यंत ब्लॉक बसविणे. मंजूर रक्कम ३.३० लक्ष

१३. शिरभावी होवाळ वस्ती भिमनगर दगडू होवाळ वस्ती ते सौदागर रामचंद्र होवाळ घरापर्यंत ब्लॉक बसविणे. मंजूर रक्कम ३.३० लक्ष

१४. शिरभावी मोहन वाघमारे वस्ती ते अंबादास मेटकरी वस्ती रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे. मंजूर रक्कम ३.३० लक्ष

१५. शिरभावी दिनेश होवाळ वस्ती ते मुलाणी वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण करणे. मंजूर रक्कम ३.३० लक्ष

१६. हातीद घोरपडी रस्ता ते दत्ता होवाळ मळा रस्ता खडीकरण करणे. मंजूर रक्कम ३.३० लक्ष

१७. हातीद यल्लामाई मंदिरासमोर पेविंग ब्लॉक बसवणे. मंजूर रक्कम ३.३० लक्ष

१८. हातीद महादेव वाघमारे घर ते विनायक होवाळ गल्ली पेविंग ब्लॉक बसविणे. मंजूर रक्कम ३.३० लक्ष

१९. हातीद दगडू मलमे घर ते दशरथ कांबळे घरापर्यंत पेविंग ब्लॉक बसविणे. मंजूर रक्कम ३.३० लक्ष

२०. हातीद बाळू होवाळ ते दिलीप कांबळे घरापर्यंत खडीकरण करणे. मंजूर रक्कम ३.३० लक्ष

२१. तिप्पेहळी गौतम मोरे वस्ती ते ज्ञानु मोरे घरापर्यंत पेविंग ब्लॉक बसवणे. मंजूर रक्कम ३.३० लक्ष

२२. तिप्पेहळी प्रकाश मोरे ते मचे मोरेवस्ती पर्यंत कॉंक्रीट रस्ता करणे. मंजूर रक्कम ३.३० लक्ष

२३. चिणके हेगडे वस्ती येथे भुयारी गटार बांधणे. मंजूर रक्कम ३.३० लक्ष

२४. चिणके काटेवस्ती येथे भुयारी गटार बांधणे. मंजूर रक्कम ३.१० लक्ष

२५. मेथवडे भाऊदेव रणदिवे वस्ती रस्ता करणे. मंजूर रक्कम ३.०० लक्ष

२६. मेथवडे संगेवाडी ते लक्ष्मण रणदिवे वस्ती रस्ता मुरमीकरण करणे. मंजूर रक्कम ३.०० लक्ष

२७. कडलास उरे मागासवर्गीय वस्ती येथे बंदिस्त गटार बांधणे. मंजूर रक्कम ३.०० लक्ष

२८. कडलास इंदिरानगर येथे बंदिस्त गटार बांधणे. मंजूर रक्कम ३.०० लक्ष

२९. कडलास इंदिरानगर द्वारका ताई घर ते यल्लाप्पा पवार घर बंदिस्त गटार बांधणे. मंजूर रक्कम ३.०० लक्ष

३०. गावठाण मागासवर्गीय वस्ती येथे बंदिस्त गटार बांधणे कडलास. मंजूर रक्कम ३.०० लक्ष

३१. बलवडी पाटी रोड ते नामदेव कोरडे शेतापर्यंत रस्ता करणे. मंजूर रक्कम ३.०० लक्ष

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या मागासवर्गीय वस्तीमधील विकासकामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून मागासवर्गीय वस्त्यांमधील विकास कामांना लवकरच सुरुवात होणार आहे व अजूनही ५ कोटी ची  नवीन कामे मंजुरी साठी दिले असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments