google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दिपकआबांच्या मध्यस्थीने झेडपीअध्यक्ष कांबळे व सभापती मोटे यांच्या वादावर पडदा

Breaking News

दिपकआबांच्या मध्यस्थीने झेडपीअध्यक्ष कांबळे व सभापती मोटे यांच्या वादावर पडदा

 दिपकआबांच्या मध्यस्थीने झेडपीअध्यक्ष कांबळे व सभापती मोटे यांच्या वादावर पडदा


सोलापूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती अनिल मोटे यांच्याकडे आपल्या स्वीय सहाय्यक मार्फत टक्केवारीची मागणी केली होती, खुद्द अध्यक्ष सभापतींना टक्केवारी मागतो ते सुद्धा ज्यांनी कांबळे यांना अध्यक्ष केलं त्यांचे परत करायचे म्हणून यासाठी. 


हा विषय स्थायी समिती मध्ये अतुल पवार यांनी मागणी केल्यावर घेरडी ग्रामपंचायतला व्यापारी गाळे मंजूर केल्यानंतर नाराज झालेल्या सभापती मोटे यांनी तब्बल 6 महिन्याने माध्यमांसमोर आणला. अध्यक्षांच्या खाजगी दालनात झालेला संवाद व्हिडीओ रेकॉर्डिंग केला होता. यामुळे मूळ सभापती अनिल मोटे व अतुल पवार यांचा वाद बाजूलाच राहिला, अध्यक्ष विरुद्ध सभापती अशा नव्या वादाला तोंड फुटले. 


मोटे यांच्या पत्रकार परिषदेवेळी ज्येष्ठ सदस्य भारत आबा विशेष उपस्थित होते, मग यामागे भारत आबा हेच मोटे यांना मार्गदर्शन करत होते का?असा प्रश्न जिल्हा परिषद आवारात उपस्थित होत आहे. हा विषय उमेश पाटलांनी जोरजोरात सर्वसाधारण सभेत उचलला, जितक्या ताकदीने उमेश पाटलांनी विषय रेटला तितक्याच जोराने ते तोंडघशी पडले. अध्यक्ष साडे चार कोटी वसूल करत आहेत म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत सदस्यांची खरेदी झाली का? यावर अध्यक्षांना मतदान केलेले सदस्य उमेशरावांवर तुटून पडले शेवटी तो शब्द पाटलांना मागे घ्यावा लागला.


त्याच दिवशी जिल्हा नियोजन समिती सभा होती या सभेनंतर दीपकआबा साळुंखे हे बाहेर आले, त्यांच्या मागे सभापती मोटे होते, एका बाजूला अध्यक्ष कांबळे व अतुल पवार बोलत होते तेव्हा दीपक आबांनी अतुल पवारांना आपल्याकडे बोलावले त्यानंतर त्यांनी अध्यक्षांना पाहिले तेव्हा आबांनी अध्यक्ष अण्णांना सुद्धा बोलावून सभापती मोटे सह आता बास करा राहिले दोन महिने भांडू नका, समन्वयाने काम करा अशा सूचना करत दोघाच्या हातात हात दिला. स्वतः दिपक आबांनी हा विषय मिटवल्याच दिसून आले.




Post a Comment

0 Comments