google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना आ.शहाजीबापू पाटील यांची दिवाळी भेट

Breaking News

सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना आ.शहाजीबापू पाटील यांची दिवाळी भेट

 सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना आ.शहाजीबापू पाटील यांची दिवाळी भेट


नीरा उजवा कालव्याच्या भूसंपादनाचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा

सांगोला (प्रतिनिधी): गेल्या अनेक वर्षांपासून नीरा उजवा कालव्याचे भूसंपादन होऊन काम देखील पूर्णत्वास आले आहे. मात्र भूसंपादन होऊनही शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्याची फाईल लाल फितीत अडकली होती. भूसंपादनाचा मोबदला तात्काळ मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत आमदार शहाजीबापू पाटील संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला असून शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी हिरवा सिग्नल मिळाला आहे. अखेर आ.शहाजीबापू पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यांमुळे नीरा उजवा कालव्याच्या भूसंपादनाचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने शेतकऱ्यांना दीपावलीची भेट दिली आहे. सांगोला तालुक्यातील निरा उजवा कालव्याचे काम होऊन बरीच वर्षे झाली.


 परंतु सदर कालव्याचे काम पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळणे आवश्यक होते. परंतु बरीच वर्षे शेतकऱ्यांच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत नव्हती. कधी निधीचा अभाव तरी कधी कागदपत्रांची अडचणी यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील हे विजयी झाल्यापासून भूसंपादनाचा मोबदला शेतकर्‍यांना मिळवून देण्यासाठी सततचा पाठपुरावा करीत होते. अनेक वर्षापासून धूळ खात बसलेल्या फायलींना आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रकाशात आणले असून शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याची प्रक्रिया जलद गतीने चालू झाली. संबंधित अधिकार्‍याला सूचना, आदेश देऊन आमदार शहाजीबापू पाटील यांनी जलद गतीने भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली. लवकरच नीरा उजवा कालव्याचे सांगोला तालुक्‍यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन झालेले आहेत त्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सततच्या पाठपुरावा करून आमदार शहाजीबापू पाटील यांनी शेतकऱ्यांना दिवाळीची गोड भेट दिली आहे.

Post a Comment

0 Comments