google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 झेडपीत सांगोल्याचे राजकारण पेटले ; काय घडले स्थायी समिती बैठकीत?का केला राष्ट्रवादीच्या बैठकीत अतुल पवार यांचा निषेध

Breaking News

झेडपीत सांगोल्याचे राजकारण पेटले ; काय घडले स्थायी समिती बैठकीत?का केला राष्ट्रवादीच्या बैठकीत अतुल पवार यांचा निषेध

 झेडपीत सांगोल्याचे राजकारण पेटले ; काय घडले स्थायी समिती बैठकीत?का केला राष्ट्रवादीच्या बैठकीत अतुल पवार यांचा निषेध


सांगोला तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. आबांच्या जाण्याने दुसरा आबा काहीसा एकटा पडला आहे, मोठा आणि शब्दाला मान असलेला नेता गेल्याने राजकारण विस्कळीत झाल्याचं बोललं जातंय. त्याचे पडसाद आता जिल्हा परिषदेत उमटू लागले आहेत. सांगोल्यातील सात सदस्यांपैकी दोन राष्ट्रवादी, तीन शेकाप आणि दोन शिवसेनेचा सदस्य आहे. सध्या सेनेचे अतुल पवार, समाज कल्याण सभापती संगीता धांडोरे, ऍड सचिन देशमुख, दादासाहेब बाबर हे चार सदस्य एका बाजूने आहेत, तर कृषी सभापती अनिल मोटे, सदस्या स्वाती कांबळे यांचा गट वेगळा आहे. सभापती अनिल मोटे यांच्या घेरडी ग्रामपंचायतची सत्ता सेनेच्या अतुल पवार यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे, पवार गटाचा सरपंच आहे, त्यामुळे सभापती मोटे आणि अतुल पवार यांच्यात सध्या शीतयुद्ध सुरू आहे. 


या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेरडी गावात ग्रामपंचायतच्या वतीने गाळे बांधण्याचा ठरावाचा विषय होता, हा ठराव समाज कल्याण सभापती संगीता धांडोरे यांनी चिट्ठीतून अतुल पवार यांना मांडण्यासाठी दिला तो ठराव पवार यांनी वाचून दाखवला मात्र सभापती मोटे यांनी या ठरावाला डायसवरून विरोध केला, याच वेळी  राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेश पाटील यांनी मोहोळ तालुक्यातील अनगर गावातील एका विषयाला अनुमोदन दिले होते,


 तेव्हा घेरडीच्या ठरावाला मोटे यांनी अनुमोदन द्यावे अशी अपेक्षा अतुल पवारांनी व्यक्त केली, मात्र मोटेनी नकार दिला, तेव्हा मोटे-पवार यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली, अरेतुरे होऊन तू काय तालुक्याचा ठेका घेतलाय का? ए अन्या.., वगैरे..,असे असंसदीय शब्द सभेत दोघांच्या तोंडून बाहेर पडले. एकमेकांची माप काढण्यापर्यंत विषय गेला, वाद इतका झाला की एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत मजल गेली, अध्यक्ष व उपाध्यक्ष दोघे नव्हते म्हणे, शेवटी सर्वांनी मिळून वाद थांबवला मात्र आपला अपमान झाला समजून   पवार वर कोण कारवाई करत नाही म्हणून मोटे सभा सोडून बाहेर पडले अशी माहिती मिळाली. मागील काही दिवसांपासून मोटे हे सभापती असतानाही डायस वरूनच विरोध करताना दिसत आहेत.

त्यानंतर या घटनेचा विषय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत झाला तेव्हा अतुल पवार यांचा निषेध नोंदवण्यात आल्याचे समजले, आता मोटे हे पवारांच सगळंच बाहेर काढण्याची भाषा करत आहेत, तर अतुल पवारांनी मी कुठल्याही आव्हानाला तयार असल्याचं सांगितलं आहे. मुळात अतुल पवार यांनी पुढील झेडपी निवडणूक ही स्वतःच्या गटा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्काचा असलेल्या जवळा या मतदारसंघातून लढवायचे नियोजन केले आहे. तशी उघड मोर्चेबांधणी सुरू केली आहे, झेडपी मध्ये सुरू असलेल्या पवार-मोटे वादाचे खरे कारण जवळा गटाची मोर्चेबांधणी असल्याचे बोलले जाते

Post a Comment

0 Comments