google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सात वर्षाच्या मुलाचा नरबळी? | हळदी कुंकू लावून फेकून दिला मृतदेह ; खळबळजनक प्रकार

Breaking News

सात वर्षाच्या मुलाचा नरबळी? | हळदी कुंकू लावून फेकून दिला मृतदेह ; खळबळजनक प्रकार

 सात वर्षाच्या मुलाचा नरबळी? | हळदी कुंकू लावून फेकून दिला मृतदेह ; खळबळजनक प्रकार


महाराष्ट्राला हादरवणारी घटना कोल्हापुरात घडली आहे. एका सात वर्षीय मुलाचा नरबळी देण्यात आला आहे. या घटनेनं सपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ७ वर्षीय मुलाचं अपहरण करून त्याचा नरबळी देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कापशीमध्ये नरबळी देण्यात आला आहे. अपहरण केलेल्या 7 वर्षीय आरव केशव केशरे याचा नरबळी दिला आहे. आरवच दोन दिवसांपूर्वी अपहरण झाल होतं. शाहूवाडी तालुक्यातील कापशी गावातील धक्कादायक घटना समोर आली आहे.


आरवचा मृतदेह घरामागे हळद कुंकू लावून टाकण्यात आला होता. यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. पहाटे 6 वाजता आरवचा मृतदेह घराबाहेर सापडला. या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.आरव केशव केशरे असं या सात वर्षाच्या चिमुरड्याचं नाव आहे. घराबाहेर खेळत असताना दोन दिवसांपूर्वी आरवचं अपहरण झालं होतं. यानंतर पोलिसांसोबतच गावकऱ्यांकडून आरवचा शोध घेतला जात होता. मात्र त्याचा शोध लागत नव्हता. त्यानंतर मंगळवारी पहाटे सहा वाजता गावापासून दूर असणाऱ्या एका जुन्या घराच्या मागे आरवचा मृतदेह सापडला. यावेळी त्याच्या शरीरावर हळद कुंकू लावलेलं होतं. यामुळे हा नरबळीचा प्रकार असावा अशी शक्यता गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments