google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महापालिका प्रभाग रचना 28 ऑक्टोबरला नाही ; पहा काय म्हणाले आयुक्त

Breaking News

महापालिका प्रभाग रचना 28 ऑक्टोबरला नाही ; पहा काय म्हणाले आयुक्त

 महापालिका प्रभाग रचना 28 ऑक्टोबरला नाही ; पहा काय म्हणाले आयुक्त


(सा.शब्दरेखा एक्सप्रेस न्युज ) सोलापूर महापालिका निवडणुक येत्या फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. त्यासाठी सुरुवातीला एक सदस्य प्रभाग रचना करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने केल्या होत्या त्या निर्णयाला सत्ताधारी पक्षांनी विरोध केला दोन किंवा तीन सदस्य प्रभाग रचना करण्याची मागणी पुढे आली त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली व 3 सदस्य प्रभाग रचना करण्याचे ठरले, तशा सूचना निवडणूक आयोगाने सर्व महापालिकांना केल्या.


 सोलापूर महापालिकेने 3 सदस्य प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार केला आहे. दरम्यान सोलापूर शहरात येत्या 28 ऑक्टोबर रोजी महापालिका निवडणूक प्रभाग रचना व आरक्षण जाहीर होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.


याप्रकरणी महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांना विचारले असता त्यांनी कोणताही कार्यक्रम 28 ऑक्टोबर रोजी नसल्याचे सांगितले. प्रथम आम्हाला 3 सदस्य प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा निवडणूक आयोगाला पाठवावा लागेल त्यानंतर पुढे प्रभाग रचना व आरक्षण जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे प्रभाग रचनेला अजून अवधी असल्याचे दिसून येते.

Post a Comment

0 Comments