कायदा सर्वाना समान-रोज आश्रम,कुंभमेळा,गांजा ओढणाऱ्या बाबांनाही तुरुंगात टाका..राज्यमंत्री रामदास आठवले
(सा.शब्दरेखा एक्सप्रेस न्युज) ; देशात कायद्यापुढे सगळे समान असतात.मग तो शाहरुख खानचा मुलगा आर्यन असो, की कुंभमेळ्यात गांजा ओढणारे भोंदू बाबा. त्या सर्वांवर कारवाई होणे गरजेचे आहे. एनसीबीला पाच ग्रॅम ड्रग्जची माहिती मिळू शकते मग सर्रास गांजा, ड्रग्ज ओढणारे बाबा का दिसत नाहीत? आश्रमात ड्रग्ज खरेदी-विक्री होत असेल तर नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोने तिथेही कारवाई करावी, अशी सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केली.
जनतेमध्ये चर्चा नुसार गुजरातच्या अदानी संचालित मुंद्रा बंदरात पकडल्या गेलेल्या अमली पदार्थाच्या मोठय़ा साठय़ाचे (२,९८८ किलो हेरॉइन) काय झाल याच उत्तर अनुत्तरित असून हे प्रकरण दाबण्यासाठी हा प्रकार चालू आहे. क्रूझवर एनसीबीच्या छाप्याचे गणित शाहरुख खान याचा एकट्याच मुलावर कसे रोज गल्ली बोळात दारू,गांजा,ड्रग्ज,इत्यादी अंमली पदार्थ लाभार्थी आजपर्यंत कार्य तत्परता रेकॉर्ड धाडी तपासल्या वर समान न्याय दिसत नाही.अशी राजकिय भक्तजन सोडून चर्चा दिसून येत आहे.
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे दलित असल्यामुळेच महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे त्यांना लक्ष्य करीत आहेत. स्वत:च्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी अटक केल्यामुळे खवळलेल्या नवाब मलिकांनी वानखेडे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे, असा आरोप आठवले यांनी केला. सगळ्यांनाच समान न्याय हवा. नशा करणाऱ्या भोंदू बाबांनाही कायद्यानुसार तुरुंगात डांबावे आणि सामाजिक न्याय विभागाच्या भूमिकेनुसार त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात भरती करावे.असा सल्ला्ला्ही त्यांनी दिल्याची बातमी प्राप्त झाली आहे.
0 Comments