आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांचे कार्य दुर्लक्षित केले - उपप्राचार्य प्रा. संभाजी शिंदे
सांगोला...भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्यात आली नाही. सन १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारे व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरले गेले. ते म्हणजे 'राजे उमाजी नाईक'. 7 सप्टेंबर या आद्यक्रांतिकाराचा जन्मदिन. रामोशी-बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहत नाही. त्यामुळे, राजे उमाजी नाईक फक्त रामोशी-बेरड समाजापुरते सीमित राहून गेल्यासारखे होत आहे. पण सर्व जाती-धर्मांनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. क्रांतिकारकांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जातिधर्मातील लोकांनी केले पाहिजे. मग हे राजे उमाजी नाईक असे उपेक्षित का राहून गेले हे आश्चर्य आहे.. 'मरावे परि क्रांतिरूपे उरावे' अशी उक्ती आहे ती आद्यक्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते. ते स्वतःच्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत.
त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीही स्वतःला रोखू शकले नाहीत असे विचार प्रमुख पाहुणे उपप्राचार्य प्रा. संभाजी शिंदे यांनी व्यक्त केले. सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. रघुनाथ फुले होते. यावेळी मेजर वाघमोडे, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. विजयकुमार घाडगे, प्रा. डॉ. दिलीप कसबे, प्रा. हनुमंत कोळवले, प्रा. अविनाश लोखंडे, प्रा. अशोक वाकडे, स्वप्नील शिंदे आदी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्ताविक व सूत्रसंचालन नियोजन समितीचे चेअरमन प्रा. डॉ. दिपक रिटे यांनी केले तर आभार प्रा. धैर्यशील भंडारे यांनी व्यक्त केले.
0 Comments