स्वाभिमानी होलार समाज संघटनेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी आवाज उठवणार. मा शिवाजीराव जावीर
मंगळवेढा प्रतिनिधी स्वाभिमानी होलार समाज संघटनेच्या माध्यमातून समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या दरबारात संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवून ते प्रश्न मार्गी लावणार असे विचार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव जावीर यांनी मौजे शिरनांदगी तालुका मंगळवेढा येथे शाखा उद्घाटन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे मार्गदर्शक नेते प्रा दत्ता हेगडे होते याप्रसंगी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष उत्तम केंगार मंगळवेढा तालुका नेते सुरेश केंगार सरपंच गुलाबराव थोरबोले मरवडे ग्रामपंचायत सदस्य तथा संघटनेचे तालुका उपाध्यक्ष समाधान ऐवळे भीम आर्मी चे जिल्हाध्यक्ष गडहीरे पंढरपूर स्वाभिमानी होलार संघटनेचे तालुकाध्यक्ष मारुती आईवळे भीम आर्मी चे जिल्हाध्यक्ष गड हिरे युवा नेते सोमनाथ दादा हेगडे नंदुरकर शाखाध्यक्ष पैलवान विलास भजनावळे यांच्यासह महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
प्रा हेगडे बोलताना पुढे म्हणाले होलार समाजाच्या चुकीच्या नोंदी जातीचा सर्वे स्वतंत्र महामंडळ यांच्यासह अनेक समस्या अनेक अडचणी समाजाच्या आहेत ते सोडविण्यासाठी आपण संघटनेच्या माध्यमातून राज्यभर दौरे करून गाव तिथे शाखा च्या माध्यमातून तळागाळात जाऊन समाजाचे प्रश्न जाणून ते सोडवण्यासाठी आपण संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.शासनाला जाग आणण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम होलार बांधवांचा स्वाभिमानी होलार समाज संघटनेच्या माध्यमातून मोठा मोर्चा मंत्रालयावर काढणार असून यासाठी राज्यातील होलार समाजातील युवकांनी जागृत होऊन संघटनेच्या माध्यमातून मागे मोठ्या ताकदीने उभा राहिले राहिले पाहिजे असे ते शेवटी म्हणाले.
यावेळी गावचे सरपंच गुलाबराव थोरबोले संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष उत्तम केंगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर यांनी आपले अनमोल विचार व्यक्त केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिरनांदगी शाखेचे शाखा अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी यांच्यासह सर्वांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमासाठी शेकडो होलार समाज बांधव उपस्थित होते समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष मारुती ऐवळे युवा नेते सोमनाथ दादा हेगडे नंदुरकर शाखा अध्यक्ष विलास भजनावळे
0 Comments