गौरी - गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिला स्पर्धकांना माहेरची साडी देण्यात येणार....सौ. सुचिताकाकी मस्के
सांगोला / प्रतिनिधी यंदाच्याही वर्षी गणेशोत्सव व गौरीपूजन या सणावर कोरोनाचे संकट असले तरीही , महिलांच्या कला - गुणांना वाव मिळावा , यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सांगोला शहरासाठी घरगुती गौरी - गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण आले आहे . स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना सुप्रियाताई चषक यासह रोख रक्कम आणि खास करून विजेत्या स्पर्धकांसह , स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिला स्पर्धकांना माहेरची साडी देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगोला विधानसभा मतदार संघाच्या महिला अध्यक्षा सुचिताकाकी मस्के यांनी दिली .
सजावट स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रथम विजेत्या महिला स्पर्धकांस ९ ६०१ रुपये व सुप्रियाताई चषक , द्वितीय विजेत्या स्पर्धकांस ७६०१ रुपये व चषक , तृतीय विजेत्या स्पर्धकांस ५६०१ रुपये व चषक आणि चतुर्थ विजेत्या स्पर्धकांस ३६०१ रुपये आणि चषक दिले जाणार आहे . स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सदस्यांकरिता निःशुल्क प्रवेश राहणार आहे . आपण सजविलेल्या महालक्ष्मी आरासचे ४ बाय ६ आकाराचे रंगीत छायाचित्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन व दैनिक सांगोला सुपरफास्ट कार्यालय येथे आणून द्यावे . या स्पर्धेतील विजेत्यांना प्रोत्साहनपर सुप्रियाताई चषक हे पारितोषिक देण्यात येणार आहे . तसेच सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकांना माहेरची साडी देण्यात येणार आहे.जास्तीत जास्त कुटुंबांनी यामध्ये सहभागी व्हावे , असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगोला विधानसभा मतदार संघाच्या महिला अध्यक्षा सुचिताकाकी मस्के यांनी केले आहे .
0 Comments