google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भाजपने ३५ जागा जिंकून बेळगाव महापालिकेत मिळवली एकहाती निर्विवाद सत्ता !

Breaking News

भाजपने ३५ जागा जिंकून बेळगाव महापालिकेत मिळवली एकहाती निर्विवाद सत्ता !

 भाजपने ३५ जागा जिंकून बेळगाव महापालिकेत मिळवली एकहाती निर्विवाद सत्ता !


गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असलेल्या बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ३५ जागा जिंकत निविर्वाद सत्ता मिळविली आहे . महाराष्ट्र एकीकरण समितीला येथे केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे दरम्यान दहा नगरसेवक निवडले गेल्याने काँग्रेस दुसऱ्या स्थानावर राहिला आहे . . बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान झाले होते तर आज सोमवार ६ रोजी मतमोजणी झाली . सुरूवातीपासूनच भाजपाने आघाडी घेतली होती ती मतमोजणीच्या अखेरपर्यंत कायम राहिली . या निवडणुकीत भाजपाने ३५ , काँग्रेस १० , अपक्ष ८ , महाराष्ट्र एकीकरण समिती ४ , तर एमआयएम ने १ जागा मिळाली आहे मागील निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे ३२ सदस्य सभागृहात होते . मात्र यंदा त्यांची पिछेहाट झालेली दिसत आहे .या निवडणुकीत एकूण ३८५ उमेदवार रिंगणात होते  


या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ५५ या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ५५ जागा लढविल्या होत्या . तर या पाठोपाठ काँग्रेस ४५ , महाराष्ट्र एकीकरण समिती २१ तर जेडीएस ११ , आम आदमी पार्टी ३७ , एमआयएमने ७ तर २१७ अपक्ष उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते . आज सकाळपासून मोठ्या बंदोबस्तात मतमोजणी पार पडली आहे काही महिन्यांपूर्वीच बेळगाव लोकसभेची पोटनिवडणूक झाली होती यात भाजपाची सरशी झाली होती . तर येथील महापालिकाही भाजपाकडे आली कर्नाटकात भाजपाचे राज्य आहे . . . आता बेळगाव महापालिकेतही या पक्षाने सत्ता काबीज केली आहे . येथे महापौर निवडीच्या वेळी खासदार व आमदारांनाही मतदानाचा अधिकार असतो यासाठी महापालिकेत ३३ सदस्य निवडणून आल्यास त्या पक्षाचा महापौर बनतो भाजपाला ३५ जागा मिळाल्या असून या पक्षाचे येथे २ खासदार व २ आमदार आहेत .

Post a Comment

0 Comments