google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सहा ब्रास वाळूसह ५० लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

Breaking News

सहा ब्रास वाळूसह ५० लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

 सहा ब्रास वाळूसह ५० लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त


पोलीस नाईक विजय थिटे यांनी संभाजी आनंदा माने (रा. बोरगाव, ता. तासगाव, जि. सांगली), दऱ्याप्पा विठ्ठल माळी (रा. आंधळगाव), राजाराम हुमान्ना येड्डे (रा. भालेवाडी, ता. मंगळवेढा) व सुखदेव निवृत्ती कोळेकर या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.


पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू चौगुले, पोलीस हेड कॉन्स्टेबल अस्लम काझी, पोलीस नाईक विजय थिटे पेट्रोलिंग करत असताना गुरुवारी सकाळी ६.४५ च्या सुमारास कोंबडवाडी ओढ्याजवळ चालक-मालक जेसीबीच्या सहाय्याने विनापरवाना ६० हजारांची ६ ब्रास वाळू टिप्परमध्ये भरून सांगलीला घेऊन जाण्याच्या तयारीत होते.


यावेळी पोलिसांनी अचानक छापा टाकून एमएच ५०/२७९९, एमएच १३/ सीयू २४८४, एमएच १६/ सीसी ४८७७ या ३० लाख रुपयांच्या तीन टीपरसह २० लाख रुपये किमतीचा जेसीबी असा सुमारे ५० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Post a Comment

0 Comments