संतापजनक! मंगळवेढ्यात वाळू माफियांच्या गाडीने पोलिसाला चिरडले; पोलिसाचा जागीच मृत्यू
वाळूची गाडी थांबवताना पोलीस कॉन्स्टेबल गणेश प्रभू सोनलकर ( 32) यांना भरधाव वेगाने येणाऱ्या वाळू टेम्पोने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी 9.30 च्या सुमारास गोनेवाडी-शिरशी रोडवरील हॅट्सन डेयरी येथे घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोकअदालत असल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल गणेश सोनलकर हे समन्स बजावण्यासाठी गेले होते.गोनेवाडीचे पोलीस पाटील यांना हॅट्सन डेयरी येथे या म्हणून गणेश सोनलकर हे वाट पाहत तिथे थांबले होते.समोरून येणाऱ्या वाळूच्या टेम्पोला हात केला असता वाळू टेम्पो चालकाने गाडी त्यांच्या अंगावर घालून चिरडले असता त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.या तील आरोपींना लवकरच पकडण्यात येणार असल्याचे अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव यांनी बोलताना सांगितले.
0 Comments