योग्य वाटा दिल्यास आघाडी करणार आरपीआय तालुकाध्यक्ष ; खंडू ( तात्या ) सातपुते आगामी निवडणूक पूर्ण ताकतीनिशी लढणार
सांगोला / प्रतिनिधीः आगामी काळामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका या जोमात होणार असून यासाठी प्रत्येक पक्ष आपापली बाजू ठाम स्वरूपामध्ये मांडत आहे.याच पार्श्वभूमीवर मागील नगरपालिका निवडणुकीत भाजपा , शिवसेना , आरपीआय मित्र पक्ष यांच्या महायुतीतून निवडणूक लढविली होती.सांगोला नगरपालिका निवडणुकीत महायुती झाल्याने आरपीआय पक्षातून दोन उमेदवार निवडून दिले होते . परंतु आगामी निवडणुकीत भाजप कोणत्या पाची आघाडी करेल त्या आघाडीमध्ये आरपीआयला योग्य बाटा दिल्यास त्यांच्याबरोबर आघाडी करणार , अन्यथा आरपीआय पक्ष स्वबळावर लढण्यास सज्ञा आहे.
यामुळे आगामी निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याची माहिती आरपीआय तालुकाध्यक्ष खंडू ( तात्या ) सातपुते यांनी दिली आहे . नगरपालिके या निवडणुकीमध्ये उमेदवाराची पात्रता बघून योग्य तो निष्ठावंत उमेदवार आरपीआय पक्षामधून उभा करू.यासंदर्भात २७ सप्टेंबर रोजी आरपीआय पक्षाची जिल्हा कार्यकारिणीची बैठक महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मा.ना. राजाभाऊ सरवदे व जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली संत तत्परेम महाराज मठ पंढरपूर या ठिकाणी आयोजित केली आहे . तरी कार्यकत्यांनी या बैठकीस उपस्थित राहण्याची देखील आवाहन करण्यात आलेले आहे .
0 Comments